राष्ट्रीय

July 5, 2024 8:39 PM

२०२३-२४ या वर्षात देशात संरक्षण सामुग्रीचं विक्रमी उत्पादन

देशात २०२३-२४ या वर्षांत संरक्षण सामुग्रीचं विक्रमी मूल्याचं उत्पादन झालं. २०२३-२४ या वर्षांत उत्पादन मूल्य सुमारे एक लाख २६ हजार ८८७ कोटी रुपयांपर्यंत होतं. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १६ पूर्णांक ८ शतांश टक्क्यांहून अधिक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेक इन इंडिया कार्यक्र...

July 5, 2024 7:49 PM

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार आहे त्याशिवाय १० हजार डब्यांचं उत्पादनही नंतर घेतलं जाणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. भारतीय रेल्वेचं गतीशक्ती विश्वविद्यालय आणि एअरबस ही खाजगी विमान उत्पादक कंपनी यांच्यामधल्या सामंजस्य करारावर स्...

July 5, 2024 7:42 PM

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नीट-पीजी प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नीट - पी जी प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा महामंडळानं आज जाहीर केलं. त्यानुसार नीट - पी जी प्रवेश परीक्षा २०२४ ही आता ११ ऑगस्ट या दिवशी दोन सत्रात घेतली जाणार आहे. ही परीक्षा गेल्या महिन्यात, परीक्षेच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आली होती. 

July 5, 2024 7:19 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबीयांच्या घेतली भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हाथरस दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यातले बहुसंख्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून त्यांना जास्तीत जास्त अर्थसहाय्य मिळावं, अशी मागणी गांधी यांनी राज्यसरकारकडे केली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने आपला अ...

July 5, 2024 2:55 PM

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात बहुतांश ठिकाणी येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, हिमाचल, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश तसंच छत्तीसगढ मध्येही पुढील तीन चार दिवसात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज विभागानं दिला आहे.महा...

July 5, 2024 2:52 PM

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर झालं आहे. त्यात नीरज चोप्रा, अविनाश साबळे, कुशोर कुमार जेना, सर्वेश कुशारे, अक्षदीप सिंह या पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. तर किरण पहल, पारुल चौधरी, ज्योती याराजी, प्रियांका गोस्वामी या महिला खेळाडूही या पथकात असतील. धावणे, भालाफेक, गोळाफेक, अडथळा शर्यत...

July 5, 2024 2:41 PM

झारखंड मुक्ती मोर्चावर झारखंडचे प्रभारी शिवराज सिंग चौहान यांची टीका

झारखंडमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बदलल्याबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे झारखंडचे प्रभारी शिवराज सिंग चौहान यांनी झारखंड मुक्ती मोर्चावर टीका केली आहे.   विरोधकांनी आपल्याला खोट्या आरोपांमध्ये अडकवून तुरुंगात डांबलं, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला होता, त्याला उत्तर देत...

July 5, 2024 3:02 PM

संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत देशातल्या ५०० तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.   संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उ...

July 5, 2024 11:30 AM

अमरनाथ यात्रेसाठी भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7,919 भाविक 259 समूहात रवाना

अमरनाथ यात्रेसाठी काल जम्मू इथल्या भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7 हजार 919 भाविक 259 समूहात रवाना झाले. यात्रेकरूंची ही 7 वी तुकडी असून, त्यात 5 हजार 241 पुरुष, एक हजार 435 महिला, 214 साधू आणि 13 साध्वी तसच 16 लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये बालतल आधार शिबिरासाठी 2 हजार 542 तर पहलगाम शिबिरासाठी 4 हज...

July 5, 2024 11:18 AM

सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात

केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या इयत्ता तिसरी आणि सहावीची, 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची नवीन पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. तिसरी आणि सहावीची नऊ पाठ्यपुस्तके य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.