राष्ट्रीय

July 18, 2024 8:05 PM

नवी दिल्लीत नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरच्या ७ वी उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरची ७ वी उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतातली अमली पदार्थांची तस्करी आणि गैर वापर रोखण्यासाठी काम करत असलेल्या विविध केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं, हे या बैठकीचं...

July 18, 2024 7:39 PM

उत्तरप्रदेश : गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड-दिब्रूगढ एक्सप्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशातल्या मानकापूर विभागातल्या गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड-दिब्रूगढ एक्सप्रेसचे २३ पैकी २१ डबे आज रुळावरून घसरले. या अपघातात २ जण मरण पावले तर २० जण जखमी झाले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं मदतकार्य ...

July 18, 2024 5:30 PM

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी २२ जुलैला पुढील सुनावणी

नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हो मत व्यक्त केलं. पुढची सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.   नीट युजी परीक्षेत गैरप...

July 18, 2024 3:10 PM

छत्तीसगडमधे नक्षलविरोधी मोहिमेत २ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या विशेष कार्यदलाचे दोन जवान शहीद झाले. या परिसरात माओवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु होती. त्यावेळी माओवाद्यांनी आई.ई.डी.चा स्फोट केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार जवानांना रुग्णालयात दाखल करण्या...

July 18, 2024 3:00 PM

हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी -भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी

हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी असल्याचं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नकारात्मक राजकीय वातावरण, देशाची सुरक्षा आणि त्याचा परिणाम याकडेही लक्ष वेधलं. लोकसभेतले विरोधी पक...

July 18, 2024 2:53 PM

बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात ईडीचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात छापा टाकला. १ हजार ३९२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी ईडीने १५ ठिकाणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात हरियाणामधल्या महेंद्रगडचे आमदार रावदान सिंह यांच्याविरोधात आणि त्यांच्या कुटुं...

July 18, 2024 3:03 PM

नीट–युजी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी ठोस कारणं हवीत – सर्वोच्च न्यायालय

नीट युजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्यापरकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातू...

July 18, 2024 1:24 PM

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांच्या थेट भरतीमध्ये हरियाणा सरकार अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार आहे.मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी काल चंडीगढ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.   हरियाणाच्या पोलिस दलात कॉन्स्टेबल, खाण रक्षक, वनरक्षक,कारागृह वॉर्डन आणि विशेष पोलिस...

July 17, 2024 8:20 PM

पोलीस आणि इतर विभागातल्या काही पदांवर थेट भर्तीत अग्निवीरांना १० % समांतर आरक्षण, हरयाणा सरकारची घोषणा

पोलीस, खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांवर थेट भर्ती करताना, हरयाणा सरकार अग्निवीरांना १० टक्के समांतर आरक्षण देणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज चंदीगढ इथे वार्ताहरांशी बोलताना ही घोषणा केली. हरयाणातल्या पोलिस हवालदार, खाण रक्षक, वनरक्षक, कारागृह अधीक्षक आणि विशेष पोलिस अधिकारी, या...

July 17, 2024 8:13 PM

‘नंन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत गेल्या ७ वर्षात ८४ हजारांहून अधिक मुलांची सुटका

रेल्वे संरक्षण दलानं नंन्हे फरिश्ते या मोहिमे अंतर्गत गेल्या ७ वर्षात ८४ हजारांहून अधिक मुलांची सुटका केल्याची माहिती रेल्वे मंत्रालायानं दिली आहे. पळून गेलेली, बेपता, अपहरण केलेली आणि मतिमंद मुलांची सुटका या मोहिमे अंतर्गत झाली आहे. नंन्हे फरिश्ते ही केवळ एक मोहीम नसून कठीण परिस्थितीत अडकलेल्या हजा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.