July 28, 2024 2:45 PM
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोक्यो इथं पोहोचले. जपानमधले भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. जयशंकर यांनी एदोगावा इथल्या फ्रीडम प्लाझा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. गांधीजींचा शांततेचा संदेश आजही तितकाच क...