डीडी बातम्या

July 3, 2024 3:31 PM

वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल. तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. विधी मंडळाच्या आवारात आज ते वार्ताहरांशी बोलत होते.  

July 2, 2024 6:12 PM

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली

आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपाच्या बांसुरी स्वराज यांनी आज हक्कभंगाची नोटीस बजावली. राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितलेल्या काही गोष्टी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्याकरता त्यांच्यावर कारवाई करावी असं स्वराज यांनी या नोटिशीत म्हटलं आहे...

June 24, 2024 3:12 PM

नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे हा तपास सोपवण्यात आला असून सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  नीट-यूजी पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयिता...

June 22, 2024 2:24 PM

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. १२ डिसेंबर २०१८ ते १२ डिसेंबर २०२३ या दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी या सवलतीसाठी पात्र असतील....

June 22, 2024 10:21 AM

20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात इंग्लंड पराभूत

20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत सेंट लुईसा मधील ग्रॉस आईसलेट इथं झालेल्या सुपर आठ सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी निवडून दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी 164 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं मात्र इंग्लंडला 20 षटकात सहा गडी बाद 156 धावा करता आल्या. विश्वचषकाचे सह-यजम...

June 22, 2024 2:50 PM

१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. यावेळी 'The Golden Thread' या माहितीपटाला आंतरराष्ट्रीय श्रेणीत सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका निशिता जैन यांना सुवर्ण शंख,...

June 22, 2024 9:35 AM

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर इथं शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात संपन्न झाला. यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणात शारीरिक, मानसिक आणि आध्...

June 18, 2024 3:24 PM

चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चित्रपटांमधल्या योगदानाबद्दल चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार’ मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. ७व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटांमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या पुरस्कारानं ...

June 16, 2024 3:08 PM

महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस ४० किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार आणि झारखंड इथं पुढले दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट राहील. महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस, ताशी ४० किलोमीटर व...

June 15, 2024 1:23 PM

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास विद्यार्थ्यांना शुल्काचा पूर्ण परतावा

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्यत्र प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे.    विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं २०२४-२५ या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे. त्यात पूर्ण परताव्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.