August 31, 2024 3:24 PM

नाशिक – डहाणू ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी अडीच कोटींच्या निधीला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

नाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या...

August 31, 2024 3:12 PM

महिला आणि युवकांनी विधानसभा निवडणुकीत सतर्क राहिले पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानसभेची ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे, महिला आणि युवकांनी या निवडणुकीत सतर्क राहिले पाहिजे अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचं 'राज्यस्तरीय महिला व युवा पदाधिकारी अधिवेशन' मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या...

August 31, 2024 2:25 PM

गाझापट्टीत पुकारलेल्या युद्धात आत्तापर्यंत ४० हजार ६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु

गाझा पट्टीतल्या खान युनिस आणि डेर अल बलाह या शहरांच्या अनेक भागांमध्ये कामगिरी पूर्ण केल्यानंतर इस्रायलचं सैन्य इथून माघारी फिरल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे. खान युनिस शहरातल्या काही भागांना आता मानवतावादी प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली असून या भागातले रहिवासी आणि विस्थापित झालेले पॅले...

August 31, 2024 2:20 PM

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची भाजपाच्या आमदारांची मागणी

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निष्प्रभ आहे, असा आरोप करत दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपत...

August 31, 2024 2:17 PM

कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाची स्थापना करण्यासाठी भारत, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामंजस्य करार

श्रीलंकेत कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाची स्थापना करण्यासाठी भारत, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. या करारामुळे हिंदी महासागर क्षेत्रातल्या आव्हानांना तोंड देणं सोपं होणार आहे. भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर तिन्ही देशांच्या प्रतिन...

August 31, 2024 2:13 PM

भारतातील UPI ने जगातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला मागे टाकले

भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून या वर्षीच्या एप्रिल ते जुलै मध्ये एक्याऐंशी लाख कोटी रुपयांची देवघेव झाली. जगातल्या डिजिटल पेमेंट मंचांना मागे टाकत भारतात या माध्यमातून होणाऱ्या पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये वार्षिक ३७ टक्के वाढ होत आहे. ग्लोबल पेमेन्ट हब पेसिक्युअरने दिलेल्या माहितीनुसार भारतात य...

August 31, 2024 2:36 PM

देशाच्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढ

देशाच्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं काल जारी केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील प्रगतीत सिमेंट, कोळसा, खनिज तेल, विद्युत, खतं, नैसर्गिक वायु, खनिज शुध्दीकरण क्षेत्र आणि पोलाद अशा क्षेत्रातील उत्पादनांचा ...

August 31, 2024 1:37 PM

जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत आरतीची कास्यपदकाला गवसणी

पेरूमधील लिमा इथे सुरू असलेल्या जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या आरतीनं काल १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. चीनच्या झुओमा बैमा हिनं सुवर्ण तर चीनच्याच मेलिंग चेन हिनं रौप्य पदक पटकावलं. आरतीने ४४ मिनिट ३९ पूर्णांक ३९ शतांश सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत राष्ट्री...

August 31, 2024 2:49 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते देहरादूनमधल्या CSIR - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इथं शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. तसंच ते राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि एम्स संस्थेलाही भेट देणार आहेत.

August 31, 2024 1:22 PM

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ॲलेक्सेई पॉपिरिन कडून नोव्हाक जोकोविचचा पराभव

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सेई पॉपिरिन यानं पराभवाचा धक्का दिला. पॉपिरिननं जोकोविचवर ६-४, ६-४, २-६, ६-४ अशी मात केली. एका वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयशी ठरण्याची जोकोविचची २०१७नंतरची ही पहिलीच वेळ आहे.  दरम्यान, भारताचा युकी भांब्री आणि त्या...