September 3, 2024 7:55 PM

रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची – मंत्री नितीन गडकरी

रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टनलिंग इंडियाच्या दुसऱ्या परिषदेला संबोधित करत होते. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं ते यावेळी म्हणाले...

September 3, 2024 7:23 PM

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात रेणापूर इथं आज दुपारी सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले. स्थानिक प्रशासन त्यांचा शोध घेत  आहे.    परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दमदार पावसामुळ...

September 3, 2024 7:09 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. जयदीप याच्यावर पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून जयदीप फरार आहे. या प्रकरणातला दु...

September 3, 2024 7:02 PM

नागपुरात तान्ह्या पोळ्यानिमित्त मारबत आणि बडग्याची मिरवणूक

तान्ह्या पोळ्यानिमित्त नागपुरात आज मारबत आणि बडग्याची  मिरवणूक काढण्यात आली. नागपुरातल्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळी मारबत, तर नेहरू पार्क इतवारी इथून काळ्या मारबतीची मिरवणूक निघाली. या मारबत उत्सवाला १४४ वर्षांची परंपरा आहे. वर्षभरातल्या विविध घटना आणि विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांची देखील मि...

September 3, 2024 8:55 PM

अहमदनगर जिल्‍ह्याचा नामांतराचा मार्ग सुकर

अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव द्यायला रेल्‍वे मंत्रालयानं हिरवा कंदिल दिल्यानं जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितलं.   जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर महायुती सरकारनं अहिल्‍य...

September 3, 2024 8:09 PM

भारताच्या शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची – आरबीआय

भारताच्या समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मिशेल पात्रा यांनी म्हटलं आहे.  ते आज भारतीय उद्योग महासंघानं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेला  संबोधित करत होते. अर्थकारण आणि विकासामधला परस्पर संबंध लक्षात घेता, भा...

September 3, 2024 6:49 PM

जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्क्यांपर्यंत वाढवला

जागतिक बँकेनं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज ७ टक्क्यापर्यंत वाढवला आहे. याआधी जागतिक बँकेनं ६ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता खासगी गुंतवणुकीसारख्या महत्त्वाच्या घटकांमुळे भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील, असं बँकेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं...

September 3, 2024 8:29 PM

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्र विधान परिषदेनं स्थापनेपासून आत्तापर्यंत गेल्या १०३ वर्षांमध्ये इथल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं आणि जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. त्या आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्...

September 3, 2024 8:30 PM

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना केंद्र सरकारची मंजुरी

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत १० भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली गेली. या सोबतच या बैठकीत भविष्यवेधी ...

September 3, 2024 3:18 PM

आंध्रप्रदेशात पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

आंध्रप्रदेशात एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या  पूरग्रस्त भागात मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद संस्था हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.    आंध...