September 4, 2024 3:22 PM

पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पिकांचं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सगळ्या नुकसानाची माहिती घेऊन लवकरात लवकर पंचनामे कर...

September 4, 2024 5:15 PM

 दिल्लीत वैधानिक संस्थेच्या स्थापनेचे अधिकार राष्ट्रपतींकडून नायब राज्यपालांना बहाल

 दिल्लीत कोणत्याही प्राधिकरण, आयोग, मंडळ किंवा इतर वैधानिक संस्थेच्या स्थापनेचे आणि त्यावर सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींनी नायब राज्यपालांना बहाल केल आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना हे अधिकार संविधानाच्या २३९व्या कलमानुसार प्रदान केल्याचं केंद्...

September 4, 2024 4:02 PM

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   विदर्भात काही भागात पावसाची संततधार राहणार असून सातारा आणि पुणे तसंच, पश्चिम महाराष्ट्रातल्...

September 4, 2024 2:02 PM

गुजरात, सौराष्ट्र,कच्छ, कोकण,गोवा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ, कोकण आणि गोवा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उत्तर तामिळनाडू, रायलसीमा भागालगतचा कर्नाटकमधला काही प्रदेश, राजस्थान, दक्षिण मराठवाडा आणि तेलंगणा, हरयाणाचा दक्षिण भाग तसंच, पश्चिम आणि ईशान्य उत...

September 4, 2024 1:36 PM

भारताला विजेवर चालणाऱ्या वाहनांचं केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट – मंत्री एचडी कुमारस्वामी

देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार काम करत असून भारताला अशा वाहनांचं केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं इलेक्ट्रिक मोबिलिटी अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहतुकीच्या राष्ट्रीय परिषदेला ते...

September 4, 2024 1:58 PM

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांचा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. करुणाकरन याने थायलंडच्या कान्तफोन वांगच्यारोएन याचा २४-२२,२३-२१ असा सरळ गेम मध्ये  पराभव करत ही फेरी गाठली तर दुसऱ्या एका सामन्यात सुब्रमणियन याने ज्योकिम ओल्डरफ याला २१...

September 4, 2024 1:37 PM

ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या ११ सप्टेंबर पासुन नवी दिल्लीत

ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे. नवीन आणि  पुनर्नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज परिषदेच्या पूर्वतयारी कार्यक्रमात  ही माहिती दिली. स्वच्छ आणि हरित इंधनाचा अधिकाधिक वापर करण्याचं उद्दिष्ट  गाठण्यात ग्रीन...

September 4, 2024 1:17 PM

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून खेळाडूंचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल शरद कुमार, मरियप्पन थंगावेलू, अजित सिंग आणि सुंदर सिंग या खेळाडूंचं,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केलं आहे.  या खेळाडूंची  कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणे असून त्यांचं यश उच्च आंतरराष...

September 4, 2024 12:19 PM

राज्यात कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार यासारख्या जलजन्य आजारांच्या रुग्णात वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात पाऊस जास्त झाल्यानं कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार यासारख्या जलजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना करत असून सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या गावांची यादीही तयार करण्यात येत आहे. यंदा जानेवारी ते ...

September 4, 2024 10:51 AM

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातले एसटी कर्मचारी बेमुदत संपावर

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला. परिणामी पुणे, सातारा, नाशिक, सांगलीसह राज्यभरातील अनेक आगारातून एसटी बस बाहेर पडल्या नाहीत. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना एस. टी. कर्मचाऱ्या...