September 5, 2024 6:57 PM

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षण

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षित आसन यापुढं कायमस्वरूपी दिलं आहे. ते कोणत्याही थांब्यावरून बसमधे आले तर त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे.

September 5, 2024 6:54 PM

मुंबईत तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन

तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन आज मुंबईत झालं. या सेतु केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपाचे अर्ज तसंच मूळ कागदपत्रं सादर करता येतील. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीही हे केंद्र मदत करणार आहे. मंडळानं आतापर्यंत जिल्हास्तरावर ४२ कामगार सुविधा...

September 5, 2024 6:42 PM

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन लक्ष्मणराव जाधव यांच्यासह केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू, भाजपा नेते मनन कुमार मिश्रा आणि ममता मोहंता तसंच राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांचा यामध्ये समावेश होता.     &nb...

September 5, 2024 5:09 PM

शिवरायांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी मूर्तीकार आणि सल्लागार यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मालवणमधला शिवाजी पुतळा कोसळल्याप्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना मालवण न्यायालयानं १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे याला काल रात्री अटक झाली होती तर चेतन पाटील गेल्या ६ दिवसांपासून पोलीस कोठडीत होता.

September 5, 2024 3:45 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. चौपाटयांसह गणेश विसर्जन स्‍थळे, कृत्रिम तलाव या ठिकाणी पालिकेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यंदा ६९ नैसर्गिक स्थळांबरोबरच २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्...

September 5, 2024 3:41 PM

नंदुरबार शहरात विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याप्रकरणी मूक मोर्चा

नंदुरबार शहरातल्या एक शाळेत पाचवीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्या प्रकरणी आज सकल मराठा समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कोठडीत झाली आहे. मात्र यात शाळा मुख्याध्यापक आ...

September 5, 2024 3:46 PM

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस – मुख्यमंत्री

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आयोजित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्य...

September 5, 2024 3:18 PM

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकर्जू...

September 5, 2024 1:42 PM

आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला आजपासून सुरुवात

गेल्या दहा वर्षांत भारताची सौर उर्जा क्षमता ३२ पटींनी वाढली असून हा वेग कायम राहिला तर २०३०पर्यंत देश ५०० गिगा वॅट इतकी सौर उर्जा निर्मिती करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्ली इथे आयोजित दोन दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला प्रधानमंत्री मोदी यांनी ...

September 5, 2024 1:41 PM

हरविंदर सिंग पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला

पॅरीस इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक्स स्पर्धेत काल भारतीय क्रिडापटूंनी चमकदार कामगिरी करत चार पदकं पटकावली. यामध्ये दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे. हरविंदर सिंगनं तिरंदाजीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. काल रात्री झालेल्या स्पर्धेत पुरुष केरी रिकर्व प्रकारांत हरविंदर ही काम...