September 25, 2024 9:55 AM

शालेय मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वं तत्काळ लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश

सर्वोच्च न्यायालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘शाळांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारनं जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुलांची सुरक्षा आणि हक्क यांच्या संरक्षणासाठी स्थापित राष्ट्रीय आयोगाला राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय सा...

September 25, 2024 9:51 AM

views 1

पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्यातील वाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सर्वोच्च न्यायालयानं पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्याच्या विस्ताराबाबत ताशेरे ओढले आहेत. ही फसवणूक असून, यामुळं अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना मागील दाराने प्रवेश मिळण्याची संधी दिली जात आहे आणि देशातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यापासून वंचित ठेवलं...

September 25, 2024 9:45 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या केंद्रातील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांच्या काळात या सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. सरकारनं देशातील युवा शक्तील...

September 25, 2024 9:20 AM

राज्याच्या विविध भागात उद्यापर्यंत अतिवृष्टिचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्यापर्यंत जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार ते अतिवृष्टिचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भुईबावडा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली. दरड हटवली असली तरी काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यानं अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवण्यात आला आहे. अहमद...

September 25, 2024 9:59 AM

अमेरिकेच्या तीन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशात आगमन

अमेरिकेच्या तीन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी क्वाड परिषद, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील परिषद या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांसह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि क्वाड नेत्यांच्या भेटी, भारतीय समुदायाशी संवाद अशा अनेक कार्यक्र...

September 24, 2024 8:32 PM

बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ग्रँडमस्टर अभिजित कुंटे यांचं स्वागत

भारतीय महिला संघाने बुडापेस्ट इथं नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. या संघाचे मार्गदर्शक असणारे पुण्याचे ग्रँडमस्टर अभिजित कुंटे यांचं आज विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू उपस्थित होते. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी ऐत...

September 24, 2024 8:27 PM

ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई

ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी रुपय...

September 24, 2024 8:24 PM

मैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं फेटाळली

मैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आज न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. राज्यपाल आपला निर्णय स्वतंत्रपणे घेऊ...

September 24, 2024 8:21 PM

रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसंच निवडणुक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ एस. एस. संधू यांनी आज रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीत धनशक्तीचा वापर खपवून घेतला जाणार नाही,असं निवडणुक आयोगानं यावेळी राज्यातल्या तसंच केंद्रीय यंंत्रणांना बजावलं. आयोगानं आज राजकीय पक्ष,...

September 24, 2024 8:18 PM

इस्रायलने लेबनॉनमधल्या हिजबुल्लांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यातल्या मृतांची संख्या ५५८ वर

इस्रायलने लेबनॉनमधल्या हिजबुल्लांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यातल्या मृतांची संख्या ५५८ वर पोहचली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात कालपासून सुरु असलेल्या संघर्षात आतापर्यंत अठराशे ३५ लोक जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लेबनॉनमध्ये कारवाया वाढवणार असल्याचं इस्राय...