September 6, 2024 1:29 PM

जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं – प्रधानमंत्री

जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी केलं आहे. गुजरातमधे  सूरत इथे,  'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ दूरस्थ पद्धतीने  केल्यानंतर ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून पाण्याच्या साठवण...

September 6, 2024 1:21 PM

आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आता नॅशनल एक्झिट टेस्ट अनिवार्य

आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी शाखांमध्ये 2021-22 पासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात एन ई एक्स टी देणं अनिवार्य असणार आहे अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल केली. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीनं स्थापन करण्यात आलेल...

September 6, 2024 1:30 PM

२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालनं पटकावलं सुवर्णपदक

२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली. ७६ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाईल प्रकारात ज्योती बरवालने युक्रेनच्या मारिया ऑर्लेविचला एकही गुण मिळू न देता तिचा दणदणीत पराभव केला. ६८ किलो वजनी ग...

September 6, 2024 12:53 PM

केरळमध्ये आजपासून १० दिवसांच्या ओणम सणाला सुरुवात

केरळमध्ये आजपासून दहा दिवसांच्या ओणम सणाला उत्साहात सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी अथम साजरा केला जातो. यानिमित्त राजा महाबली याच्या स्वागतासाठी सर्वत्र फुलांच्या  सुंदर पायघड्या घातल्या  जातात.  राजा महाबली याला भगवान विष्णूंनी  वामनाचा  अवतार घेऊन पाताळात पाठवलं होतं.  वामन जयंती आणि राजा महाबलीचं...

September 6, 2024 12:46 PM

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची जपानच्या विविध खात्यांचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सध्या जपानच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी जपानच्या विविध खात्यांचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. भारत आणि जपानमधली धोरणात्मक भागीदारी, डिजिटल व्यवहार, रेल्वे सेवा आदी मुद्यांवर या बैठकांमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. जपानचे डिजिटल ट्रॉन्सफॉर्मेशन मंत...

September 6, 2024 12:44 PM

आंध्रप्रदेशातल्या बुडामेरू कालव्यातील भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहेत. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिर...

September 6, 2024 10:56 AM

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्रातील मालवण इथल्या राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथू...

September 6, 2024 12:22 PM

राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने, 2024-25 या वर्षासाठी, राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना, अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्या...

September 6, 2024 12:20 PM

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून ४० स्टार प्रचारकांची नावं जाहीर

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने काल 40 स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली. यात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. याबरोबरच...

September 6, 2024 10:24 AM

आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत...