September 6, 2024 7:11 PM

देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण

अमेरिकेतले बेरोजगारीचे संभाव्य आकडे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात बदल होण्याच्या शक्यतेमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १ हजार १७ अंकांनी घसरून ८१ हजार १८४ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २९३ अंकांची घसरण नोंदवून २४ हजार ८५२ अंकांवर स्थिरावला. या घसरणीमुळं मुंबई शेअर बाजारातल्...

September 6, 2024 7:06 PM

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

मुंबईतले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे. फेब्रुवारी महिन्यात फेसबुक लाइव्हमध्ये बोलत असताना गोळी झाडून त्यांची हत्या झाली होती. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. पण त्यातल्या त्रुटींमुळं हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्...

September 6, 2024 7:04 PM

महायुतीचं सरकार अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेलं असून ते लवकरच पडेल – खासदार सुप्रिया सुळे

राज्यात सध्या अस्तित्वात असलेलं महायुतीचं सरकार अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेलं असून ते लवकरच पडेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आल्याचं सांगितलं जात आहे, मग नोकऱ्या का उपलब्ध होत नाहीत, अ...

September 6, 2024 6:50 PM

चंद्रपुरातलं सागवान प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवणार

चंद्रपूर जिल्ह्यातलं सागवान आता प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे.या लाकडापासून  प्रधानमंत्र्यांची खुर्ची आणि टेबल तयार केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बल्लारपूर डेपोमधून सुमारे ३ हजार घनफूट सागवान यासाठी पाठवलं जाणार आहे. यापूर्वीही संसद भवन, भारत...

September 6, 2024 7:20 PM

राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवाव्यात याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नसून राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर त्याआधीच्या सरका...

September 6, 2024 6:42 PM

आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी न...

September 6, 2024 6:40 PM

परदेशी गुंतवणूकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी  असलेल्या महाराष्ट्रानं  चालू  आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे.  एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या  एकूण गुंतवणुकीच्या 52 पूर्णांक 46 शतांश टक्के म्हणजेच सुमारे 70 हजार 795 कोटी रुपयांची प...

September 6, 2024 7:20 PM

एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. नागपूरमधे ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, म...

September 6, 2024 1:43 PM

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे खेल उत्सव २०२४चे आयोजन

मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त  माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नुकत्याच आयोजित केलेल्या ‘खेल उत्सव २०२४‘ मध्ये क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडिअमवर झालेल्या या खेल उत्सवात मंत्रालयाचे २...