September 7, 2024 9:24 AM

तेलंगणा राज्यातील ३३ पैकी २९ जिल्हे पूरग्रस्त घोषित

तेलंगणा राज्यातील ३३ पैकी २९जिल्हे पूरग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. तत्काळ मदत कार्य करण्यासाठी या जिल्ह्यांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांची मदत राज्य सरकारनेही जाहीर केली आहे. यापूर्वी चार जिल्हे पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे मदतकार्य सुरू आहे. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमुळे मृतांच...

September 6, 2024 8:26 PM

केनियामधल्या प्राथमिक शाळेत वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार, १४ विद्यार्थी जखमी

केनियामधल्या एका प्राथमिक शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार तर १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ९ ते १३ वर्ष वयोगटातले हे विद्यार्थी भर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगींमुळं ही  दुर्घटना घडल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद...

September 6, 2024 8:14 PM

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. या भागातलं तेल आणि नैसर्गिक वायू महत्त्वाचं आहेच. पण त्यासोबतच या भागात हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया क्षेत्रातही प्रचंड संधी असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत सीआयआयकडू...

September 6, 2024 8:10 PM

भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत मोठी बाजारपेठ – मंत्री पीयूष गोयल

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमधले व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. ते नवी  दिल्लीत भारत-भूमध्य व्यापार परिषदेत बोलत होते. भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत ही मोठी  बाजारपेठ असल्याचं ते म्हणाले. जागतिक व्‍यापारासाठी मार्ग उपलब्ध...

September 6, 2024 8:07 PM

तेलंगणमधल्या महापुरामुळं खम्मम जिल्ह्यातल्या नागरिकांना मदत जाहीर

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान तसंच गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी तेलंगणमधल्या महापुरामुळं संकटात सापडलेल्या खम्मम जिल्ह्यातल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या बाबत शिवराज सिंग चौहान यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याशीही चर्चा केली. केंद्र सरकारनं...

September 6, 2024 8:02 PM

संदीप घोष यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

कोलकाता इथल्या आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या सी बी आय चौकशीला आव्हान देणारी संदीप घोष यांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. संदीप घोष हे या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत. कोलकाता उच्च न्यायालयानं या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले असून आरोपी संदीप घ...

September 6, 2024 7:59 PM

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि दीपक बवरिया यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाची भूमिका महिलांसोबत उभं राहण्याची आणि कठीण काळात त्यांना साथ देण्याची असल्यानं पक्षात...

September 6, 2024 7:56 PM

माजी राज्यसभा खासदार सुजीत कुमार यांचा भाजपामध्ये प्रवेश

बीजू जनता दलाचे माजी राज्यसभा खासदार सुजीत कुमार यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तत्पूर्वी सुजीत कुमार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तो स्वीकारला. दरम्यान, बीजू जनता दलाचे अध...

September 6, 2024 7:54 PM

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातल्या संयुक्त समितीची नवी दिल्लीत बैठक

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातल्या संयुक्त समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. विविध वक्फ मालमत्तांबाबतचं व्यवस्थापन आणि प्रशासन अधिक सक्षमतेनं व्हावं , यासाठी त्यातल्या त्रुटी वगळण्याची प्रक्रिया नवीन विधेयकामार्फत केली जाणार आहे.  भारतीय पुरातत्त्व विभाग,झकत प्रतिष्ठान, तेलंगणा वक्फ बोर्ड यांनी समितीस...

September 6, 2024 8:23 PM

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं २ मीटर ८ सेंटीमीटर उंच उडी मारली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल प्रवीण कुमारचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच भारताची पदकसंख्...