September 7, 2024 7:56 PM

देशातले खेळाडू, प्रशिक्षकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध – क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय

देशातले खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांना आवश्यक त्या सर्व  सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा सन्मान केल्यानंतर बोलत होते. या सुविधांमुळे खेळाडूंना अधिक चांगलं  प्र...

September 7, 2024 7:52 PM

मंत्री एस. जयशंकर उद्यापासून दोन दिवसांच्या रियाध आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर उद्यापासून दोन दिवसांच्या रियाध आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी ते पहिल्या भारत आखात सहकार्य मंडळाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात ते सहभागी देशाच्या परराष्ट्र मंत्र्याशी द्विपक्षीय चर्चाही करतील....

September 7, 2024 7:48 PM

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला सुरूवात

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामाला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे, मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ...

September 7, 2024 7:43 PM

जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीनंतर जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, असं आश्‍वासन भाजपचे वरिष्‍ठ नेता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिलं. ते  जम्‍मूमध्ये जाहीर प्रचार सभेत बोलत होते.  आगामी विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्‍मू काश्‍मीरमध्ये पहिल्या...

September 7, 2024 7:41 PM

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांची वॉशिंग्टन इथं युद्ध प्रात्यक्षिकं

उत्तर कोरियाच्या संभाव्य धोक्याचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीनं दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन इथं युद्ध प्रात्यक्षिक केलं. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचण्या वाढवल्याच्या पा...

September 7, 2024 7:20 PM

पालघर जिल्ह्यात स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा

पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. पंधराव्या वित्त आयोगातल्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत या दिनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांतर्गत विरारमधल्या म्हाडा मैदानात वृक्षरोपण करण्यात आलं. तसचं ‘एक पेड...

September 7, 2024 7:08 PM

नंदुरबार जिल्ह्यात दहा जणांना अतिसार सदृश्य आजाराची लागण

नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातल्या लांबोळा गावात दहाजणांना अतिसार सदृश्य आजाराची लागण झाली असल्याचं आढळून आल़ं आहे. या आजारानं बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजणांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तर अन्य दोन महिलांवर शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर...

September 7, 2024 7:05 PM

२० वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाइल प्रकारात पटकावलं दुसरं स्थान

स्पेनच्या पोंटेवेद्रा इथं झालेल्या २० वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाइल प्रकारात दुसरं स्थान पटकावलं. त्यांनी १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कास्य अशी एकंदर ५ पदकं जिंकली. ६२ किलो वजनी गटात नितिका हिला काल रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर ५७ किलो व...

September 7, 2024 8:07 PM

सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह

आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी. ११ दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्ररंभ झाला. राज्यात ढोलताशांच्या गजरात गणरायाचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आगमन झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक मुंबई - पुण्यात आले आहेत. या उत्सव काळात राज्यात सुमार...

September 7, 2024 6:41 PM

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या देशवासीयांना शुभेच्छा

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशातल्या अनेक भागात एकत्रित येऊन साजरा केला जातो आणि हे  सामाजिक ऊर्जेचे एक चांगले उदाहरण आहे. असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हट...