September 8, 2024 1:28 PM

लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर

लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. अमेरिकेतल्या मेरीलँड राज्यात ग्रेटर बाल्टिमोर टेम्पल इथं मोठ्याजल्लोषात मिरवणूक काढून गणेशाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र सत्संग परिवार, मराठी हिंदू सेवा संघ कराचीमधल्या रत्नेश महादेव मंदिरात गणपती बसवतात. या...

September 8, 2024 1:22 PM

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मूमध्ये काल भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर योग्यवेळी जम्मू-काश्मीला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल असं आ...

September 8, 2024 12:03 PM

महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते 25 लाख रुपयांपर...

September 8, 2024 11:59 AM

राज्यातल्या दहा जिल्ह्यात पिकांचं नुकसान, आठ लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल

कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील दहा जिल्हयांत पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये खरिपातील सुमारे आठ लाख 48 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून, नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कृषी विभागाच्या 24ऑगस्टपासून आतापर्यंतच्या ...

September 8, 2024 11:38 AM

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वक्तव्य

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं मत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सध्या सुरू असलेल्या या संघर्षावर तोडगा काढण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला होता. त्यानंतर दोन दिवस...

September 8, 2024 11:36 AM

महाराष्ट्रासह देश-परदेशात गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या आनंद सोहळ्याला सुरुवात

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आणि जगभरातील अनेक देशातही कालपासून गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाचा प्रारंभ झाला. 64 कलांचा अधिपती, बुद्धिदात्या गणेशाचं काल सर्वत्र वाजत गाजत आगमन झालं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला ढोल ताशांच्या गजरात, उत्साहात सुरुवात झाली. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी...

September 7, 2024 8:22 PM

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागानं ओदिशा, आंध्र प्रदेशाचा  किनारी भाग आणि  तेलंगणा मध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  आगामी तीन दिवसांत तेलंगण, ओदिशा आणि  मध्‍य महाराष्ट्रात  अत्‍यधिक ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  ईशान्य भारतात आगामी सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरल, माहे, दक्षिण...

September 7, 2024 8:14 PM

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पहिली उमेदवारी जाहीर करताच पक्षात बंडखोरीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राजेश जून यांनी, उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपक्ष निवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे नेते रामकृष्ण फौजी यांन...

September 7, 2024 8:03 PM

१५ राज्यांमधील एकूण १२ हजार हेक्टर जागेत १७ लाख पाम रोपांची लागवड

खाद्यतेलाच्या पूर्ततेसाठी १५ जुलैपासून राष्ट्रीय पाम लागवड प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पातंर्गत १५ राज्यांमधील एकूण १२ हजार हेक्टर जागेत १७ लाख पाम रोपांची लागवड करण्यात आली आहे. देशात पामच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच काही पाम तेलकंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला ...

September 7, 2024 8:01 PM

पाकिस्तानात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईत चार आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर मारले गेले. या हल्लेखोरांनी मोहम्मद जिल्ह्यातल्या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर या प्रांतात इतरत्र लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी लष्करानं मोहिम  सुरू क...