September 8, 2024 3:25 PM

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नाशिक जिल्ह्याला भेट देणार

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या नाशिक जिल्ह्याला भेट देणार आहेत. उद्या सकाळी ते ओझर इथं पोहोचोतील, यानंतर ते शासकीय विश्रामगृहात नाशिक जिल्ह्यातले खासदार आणि आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या विविध यंत्रणांची आढावा बैठकही ते घेणार आहेत. यासोबतच उद्या दुपारी ते राजकीय पक्षांचे नाशि...

September 8, 2024 3:25 PM

राज्यात सध्या चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ

राज्यात सध्या चिकनगुनिया आणि डेंग्यू या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे रुग्णांची संख्या वाढत आहे. हवामान बदलामुळे डासांची शक्ती आणि प्रजननक्षमता चारपट वाढली आहे, असं चेन्नईच्या आरोग्य सल्लागार डॉक्टर जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितलं आहे. त्या नागपूर इथं आयोजित एका कार्यशाळेत बोलत होत्या. हवामान बदलामु...

September 8, 2024 2:19 PM

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला वेग येत आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रचाराला जोमदार सुरुवात केली आहे. पक्षाचे स्टार प्रचारक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज रामबन आणि बनिहालमधे प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या...

September 8, 2024 2:17 PM

मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य ८ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या ला...

September 8, 2024 7:17 PM

पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेचा आज समारोप / पदकतालिकेत भारत १८व्या स्थानावर

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप सोहळा आज रात्री होणार आहे. या कार्यक्रमात भारताचा ध्वज, स्पर्धेतला सुवर्णपदकविजेता तिरंदाज हरविंदर सिंह आणि धावपटू प्रीती पाल यांच्या खांद्यावर असेल. या स्पर्धेत एकंदर २९ पदकांची कमाई करून भारतानं पदकतालिकेत अठरावं स्थान पटकावलं आहे. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कास्यप...

September 8, 2024 2:04 PM

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. “बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे. यानिमित्तानं क...

September 8, 2024 1:54 PM

बांगलादेशाचं ‘आमार शोनार बांग्ला’ हे राष्ट्रगीत बदलण्यात येणार नाही – बांगलादेश हंगामी सरकार

बांगलादेशाचं ‘आमार शोनार बांग्ला’ हे राष्ट्रगीत बदलण्यात येणार नाही, असं बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं स्पष्ट केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रगीत बदलण्याची मागणी देशातल्या कट्टरतावादी संघटनांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रगीत बदलणार नसल्याचं स्पष्ट करत सरकारनं सुरू झालेल्या च...

September 8, 2024 1:52 PM

तेलंगणाच्या खम्मम आणि महबुबाबाद या पूरबाधित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

तेलंगणाच्या खम्मम आणि महबुबाबाद या पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत महबुबाबाद इथे १८२ मिलीमीटर तर खम्मममधल्या तल्लाडा इथे १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा जारी करण्यात ...

September 8, 2024 1:50 PM

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि यानम इथे आज अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओदिशा इथे उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला...

September 8, 2024 1:48 PM

आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारताकडून मदत

झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी या आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारतानं अन्नधान्य पाठवलं आहे. झिम्बाब्वेला एक हज़ार मेट्रिक टन तांदूळ, झांबियाला तेराशे मेट्रिक टन मका पाठवला आहे. अल-नीनो मुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या मलावीला एक हज़ार मेट्रिक टन तांदळाची मदत मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यात आली ...