September 8, 2024 8:52 PM

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या अरीना सबालेंका अजिंक्य

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या अरीना सबालेंका हिनं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिच्यावर ७-५, ७-५ अशी सरळ सेट्समध्ये मात केली आणि कारकीर्दीतलं तिसरं ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपद पटकावलं.  तत्पूर्वी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्य...

September 8, 2024 7:15 PM

विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजाचा धडक मोर्चा

गोंड, गोवारी जमातींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करण्याबाबत शासनानं सात दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु, असा इशारा या समाजानं दिला आहे. या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यात आज विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजानं त्यांच्या धडक म...

September 8, 2024 7:58 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले. या भेटीत ते रियाध इथं होत असलेल्या पहिल्या भारत-आखात सहकार्य संघटनेच्या - जीसीसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पश्चिम आशियातले ६ देश या संघट...

September 8, 2024 7:07 PM

राज्यात सोयाबीन, उडीद पिकांसाठी किमान हमीभावानं खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारची मान्यता

महाराष्ट्रासह कर्नाटकात ९० दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. या निर्णयाबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी क...

September 8, 2024 7:03 PM

राज्य सरकारनं जनहिताचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळं त्यांची फारशी चर्चा होत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. सरकारनं ज्येष्ठ नागरिक, शेतकरी,...

September 8, 2024 6:12 PM

भाजपच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात सीबीआयची कारवाई

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त, एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि एक वकील यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या...

September 8, 2024 6:07 PM

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भाजपाला सोडचिट्टी

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. काँग्रेसकडून सलग पाचवेळा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी २०१९...

September 8, 2024 8:12 PM

अमित शाह यांच्या हस्ते ‘मुंबई समाचार’ वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं अनावरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आज आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अमित शहा यांनी मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं अनावरण केलं. १८२२ मधे मुंबईत ...

September 8, 2024 5:58 PM

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्यासाठी अधिक माहिती जाणून घ्या

शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हे उमेदवार www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या...

September 8, 2024 7:06 PM

दीड दिवसाच्या गणपतींचं आज विसर्जन

गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून उत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या प्रमुख शहरांमधे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींचं दर्शन घेण्यासाठी तसंच सामाजिक संदेश देणारे नेत्रदीपक देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मुंबईत प्रसिद्ध लालबागचा राजासह इ...