September 9, 2024 1:45 PM

ऋषभ पंतचं भारतीय संघात पुनरागमन

बांगलादेशविरुद्धच्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. चेन्नईतल्या एमए चिदंबरम मैदानावर १९ तारखेपासून ही मालिका सुरू होणार आहे. के. एल राहुल आणि ऋषभ पंत यांचं संघात पुनरागमन झालं आहे, तर यश दयाल पहिल्यांदाच खेळणार आहे. ऋषभ  पंत डिसेंबर २०२२ नंतर पहिल...

September 9, 2024 1:37 PM

गणेशोत्सवाचा उत्साह देशाच्या कानाकोपऱ्यात

देशात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळत आहे. महाराष्ट्राबाहेरही गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथं महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेलं हे मंडळ मराठी पद्धतीनं गणपतीची पूजा अर्चना करतं. कानपूरमधले अनेक मराठी कुटुंबं या उत्सवात...

September 9, 2024 3:34 PM

कोलकात्याच्या राधागोविंद कार रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप मागे घ्यावा अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना

कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा  ताजा अहवाल पुढच्या मंगळवारपर्यंत सादर करावा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिल्या. सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी स्वतःहून दाखल करून घेतलेल्या...

September 8, 2024 8:58 PM

२९ सप्टेंबरला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं संबोधन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना पाठवता येतील.  या सूचना १८०० - ११ - ७८०० हा टोल फ्री क्रमांक, १९२२ या क्रमांकवर मिस्...

September 8, 2024 8:26 PM

यागी चक्रीवादळ काल व्हिएतनामला धडकून पश्चिम दिशेला गेलं

यागी चक्रीवादळ काल व्हिएतनामला धडकून पश्चिम दिशेला गेलं. या वादळामुळे देशात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून १७६ जण जखमी झाले आहेत. तसंच ३० लाखांहून अधिक नागरिकांना विजेशिवाय राहावं लागत आहे. वादळ निघून गेलं असलं तरी पूर आणि भूस्खलनाचा धोका अद्याप टळलेला नाही, असा इशारा हवामान विभागानं  दिला आहे. व्...

September 8, 2024 8:20 PM

देशात मंकीपॉक्सचा एक संशयीत रुग्ण

देशात मंकीपॉक्सचा एक संशयीत रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. त्याची चाचणी करण्यात आली असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. रुग्णाची स्थिती सध्या स्थिर असून त्याच्या संपर्कात आलेल्यांचं ट्रेसिंग सुरू असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. हा रुग्ण मंकीपॉक्सचा प्रसार सुरू असलेल्य...

September 8, 2024 8:22 PM

७व्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत देशभरात १ कोटी ७९ लाखापेक्षा जास्त उपक्रम

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्यावतीनं आयोजित ७व्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत सातव्या दिवसापर्यंत देशभरात १ कोटी ७९ लाखापेक्षा जास्त उपक्रम राबवले गेल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. यात नवजात बालकांसाठीच्या पूरक आहाराशी संबंधित २० लाखापेक्षा जास्त उपक्रमांचा समावेश होता असंही मंत्रालयानं म्हटल...

September 8, 2024 8:03 PM

टाइम या नियतकालिकेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना स्थान

टाइम या जगप्रसिद्ध नियतकालिकानं तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या सर्वांत प्रभावी व्यक्तींमध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना स्थान दिलं आहे. यासंदर्भात टाईमनं प्रकाशित केलेल्या यादीत वैष्णव यांच्या नावाचा शेपर्स या गटात समावेश केला आहे. वैष्ण...

September 8, 2024 8:01 PM

अबुधाबीचे युवराज अल नाहयान यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक

अबूधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहमद बिन झायेद अल नाहयान यांचं तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. युवराज नाहयान यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीचे अनेक मंत्री आणि उद्योगजगतातलं प्रतिनिध...

September 8, 2024 7:51 PM

भाजपा सत्तेत असेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित केलं जाणार नाही – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भाजपा सत्तेत आहे तोपर्यंत जम्मू काश्मीरमधलं ३७० कलम पुनर्स्थापित केलं जाणार नाही, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. रामबान जिल्ह्यात ते आज प्रचारसभेला संबोधित करत होते. केंद्रशासीत प्रदेशात आहे तीच स्थिती कायम ठेवण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला, तसंच जम्...