September 9, 2024 3:48 PM

आयुष्यमान कार्डमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान कायम राखलं आहे.  ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यातल्या ४ लाख १२ हजार ३३ म्हणजेच सुमारे ५० टक्के लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेच कार्ड काढलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातल्या ५  हजार ६५२ जणांनी २८ कोटी १५ लाख ८ हजार ६८...

September 9, 2024 3:44 PM

राज्याच्या अनेक भागात अद्याप पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी अजूनही पावसाचा जोर आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं काही कुटुंबांना निवारागृहात हलवलं आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक बंद आहे. मुलचेरा तालुक्यातही दिना नदीला प...

September 9, 2024 3:40 PM

नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून मानवंदना

स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱ्याने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित...

September 9, 2024 3:26 PM

जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू

जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायल संरक्षण दलानं दिली आहे. हल्लेखोर जॉर्डनचा रहिवासी असून सीमेवर ऍलनबी पूल ओलांडताना त्यानं एका ट्रकमधून येऊन गोळीबार केला. त्यानंतर संरक्षण दलाच्या जवानांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर म...

September 9, 2024 2:57 PM

आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉनक्लेव्हचं ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजन

जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी आणि माध्यमांवरचा विश्वास वाढवण्यासाठी बौद्ध शिकवणीचा वापर व्हावा या उद्देशानं येत्या ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आली आहे. संघर्ष टाळून शाश्वत विकासासाठी संवाद साधणं ही या बैठकीमागची संकल्पना आहे. सजग संवाद आणि नैति...

September 9, 2024 2:52 PM

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान २ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. नौशेराच्या लाम परिसरात काही संशयास्पद हालचाली नजरेस आल्यावर भारतीय लष्करानं काल रात्री ऑपरेशन कांची ही शोधमोहीम सुरु केली. संबंधित परिसरात पूर्णपणे उजेड करुन देखरेख वाढवली. या मोहिमेदरम्यान लपू...

September 9, 2024 2:45 PM

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ९ उमेदवारांची यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात माजी खासदार बृजेंद्रसिंग यांना उचनाकलान मतदारसंघातून तर मोहित ग्रोवर यांना गुरुग्राममधून उमेदवारी देण्यात आली आहे. ९० जागांपैकी ३२ ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. हरियाणा विधानसभेसाठी एकाच टप्प्यात येत्या ५...

September 9, 2024 3:33 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, भाजपा नेते रावसाहेब द...

September 9, 2024 2:30 PM

प्रधानमंत्री येत्या २९ सप्टेंबरला मन की बात कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी साधणार संवाद 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद  साधणार  आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.  या कार्यक्रमासाठी  आपल्या  कल्पना आणि सूचना  १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर २७ सप्टेंबरपर्यंत  देता येतील. तसंच माय  जीओव...

September 9, 2024 2:22 PM

संरक्षण विभागातर्फे तीन सेवांमधील अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रमाचं आयोजन

संरक्षण विभागानं आजपासून दिल्लीत तीन सेवांमधील अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रम आयोजित केला आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह तिन्ही दलांचे मेजर जनरल आणि समकक्ष अधिकाऱ्यांसाठी हा पाच दिवसीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या का...