September 9, 2024 6:34 PM

गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन

मानधनवाढ, पेंशन आणि अन्य मागण्या प्रशासनानं मान्य न केल्यानं गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी आज मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले. ‘सिटू’ संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. या आंदोलनात हिवताप प्रतिबंधक फवारणी कामगारही सहभागी झाले होते.

September 9, 2024 6:29 PM

मराठा आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता वृत्तसंस्थेच्या बातमीत व्यक्त केली आहे.  मराठा समाजाला २०१९ मध्ये एसईबीसी प्रवर्गांतर्गत शिक्षण आणि नोकरीमधे दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. या निर्णय...

September 9, 2024 6:22 PM

हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात बिजेंद्र हुड्डा हे रोहतक इथून तर इंदू शर्मा भिवानी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. उचना कलान मतदारसंघातून पवन फौजी आणि घरौंदा मतदारसंघातून जयपाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत.

September 9, 2024 6:17 PM

श्रीलंका राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चर्चेसाठी बोलावले

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आज चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठीचे आर्थिक व्यवहाराचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वासंबंधी चर्चा करण्यात आली. निवडणुकीत होणारा सार्वजनिक संसाधनाचा वापर तसंच काही माध्यम संस्थांच्या निवडणुकीतल्या ...

September 9, 2024 6:12 PM

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. आज सकाळी साडे दहा वाजता परेडने सरावाला सुरुवात झाली. या सरावात भारताचे बाराशे सैनिक तसंच अमेरिकन लष्कराचे सैनिक सहभागी झाले आहेत. हा सराव पंधरा दिवस चालेल. या सरावा दरम्यान अमेरिकेच्या तोफखाना यंत्रणेचं प्रात्यक्षिण क...

September 9, 2024 5:59 PM

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याच्या मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवण्याच्या सूचना  मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. वसमत तालुक्यातील माळवटा, किन्होळा आणि कुरूंदा इथल्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या  भ...

September 9, 2024 5:52 PM

भारतीय लष्कर आणि हवाई दलाचा गती शक्ती विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

लॉजिस्टिक कामांमधील कर्मचाऱ्यांचं कौशल्य आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं भारतीय लष्कर आणि हवाई दलानं गती शक्ती विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला.  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी तसंच भविष्यात  जागतिक पातळीवर सक्षम लॉजिस्टिक प्रणाली तयार करण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचं ...

September 9, 2024 5:42 PM

वक्फ दुरुस्ती विधेयक वक्फ बोर्डाच्या जमिनी, बोर्डाचे कार्यक्षेत्र यामध्ये हस्तक्षेप करणारं – राज्य वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख

लोकसभेत सादर केलेलं नवीन प्रस्तावित वक्फ दुरुस्ती विधेयक वक्फ बोर्डाच्या जमिनी, बोर्डाचे कार्यक्षेत्र यामध्ये हस्तक्षेप करणारं असल्याचा आरोप राज्य वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख यांनी केला आहे. ते आज नागपुरात जमाते इस्लामी हिंदनं आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते....

September 9, 2024 4:01 PM

नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर अनिल पाटील, नांदेड तालुक्य...

September 9, 2024 3:54 PM

यवतमाळमधे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ३६ महिला बचत गटांना ई-रिक्षाचे वितरण

प्रधानमंत्री खनिकर्म योजनेंतर्गत यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ महिला बचत गटांना तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचं वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नेरच्या महिला बचत गटाला बँक कर्जाचे चेक वितरण आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्याच्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन राठोड यां...