September 9, 2024 7:35 PM

केरळमध्ये इयत्ता नववीच्या इंग्रजीच्या पुस्तकात मुंबईच्या डबेवाल्यांच्या कहाणीचा समावेश

मुंबईची ओळख असलेल्या डबेवाल्यांच्या कहाणीचा समावेश केरळमध्ये इयत्ता नववीच्या इंग्रजीच्या पुस्तकात केला आहे. ह्यू आणि कोलीन गॅन्टझर या प्रवासी-लेखक जोडप्यानं लिहिलेला हा लेख, सन १८९०मध्ये मुंबईच्या दादर भागातून दक्षिण मुंबईत नेण्यात आलेल्या पहिल्या डब्याची गोष्ट सांगतो.

September 9, 2024 7:40 PM

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात आज अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार झाले. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतभेटीवर आलेले अबुधाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहमद बिन झायद अल नहयान यांच्याशी चर्चा केली. यावेळी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले संबध, तसंच नव्यानं ...

September 9, 2024 7:09 PM

गणेश मुर्ती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

गणेश मुर्ती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून यासाठी सुमारे १२ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेचे उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.   महापालिकेनं ७१ नियंत्रण कक्ष विविध सुविधांसह उपलब्ध करून दिले आहेत. तसंच विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह २०४ कृत्रिम...

September 9, 2024 7:06 PM

गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्य...

September 9, 2024 7:02 PM

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवून १२५ जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. उपमुख्यम...

September 9, 2024 6:58 PM

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारं शुल्क योग्य असावं तसंच...

September 9, 2024 6:51 PM

हिंगोली आणि पालघर जिल्ह्यात एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम

हिंगोली जिल्ह्यातल्या ३०५ गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही संकल्पना सुरू झाली. धुळे जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेल्या वर्षाचा तुलनेत यंदा घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये ...

September 9, 2024 7:01 PM

राज्यातल्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. आज मुंबईत वार्ताहर परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.  आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमि...

September 9, 2024 6:59 PM

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घोषणा

नाशिक इथं आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितलं. त्यांनी आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. या विद्यापीठात अभिय...

September 9, 2024 7:04 PM

मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर

दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं तिथल्या १०१ नागरिकांना निवारागृहात हलवलं आहे. धुळेपल्ली गावाजवळील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलं. पुरामुळे भामरागड-आलापल्ली, आष्टी-मुलचेरा आणि आल...