September 10, 2024 9:45 AM

देशात यंदा खरीपाच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

देशात यावर्षी खरीप पीक पेरणीत लक्षणीय प्रगती झाली आहे, एकंदर पेरणी क्षेत्र 1 हजार 92 लाख हेक्टरच्या पुढं गेलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1 हजार 69 लाख हेक्टर पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं काल खरीप पिकांखालील क्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ही माहिती देण्यात आली आह...

September 10, 2024 9:40 AM

मुंबई, ठाणे आणि पालघरमधून अडीच लाखांहून जास्त चाकरमाने एसटीने कोकणात दाखल

यावर्षी गणपती उत्सवासाठी गेल्या पाच दिवसांत, मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांहून जास्त चाकरमाने एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात रवाना झाले आहेत. 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात झालेला एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब अशा अडचणींवर मात करत एसटी ...

September 10, 2024 9:20 AM

घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन

गणेशोत्सवात आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ...

September 10, 2024 9:13 AM

पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या १२ दरवाजातून ६ हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू

  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १२ हजार ७४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक...

September 10, 2024 9:17 AM

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभि...

September 10, 2024 8:52 AM

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी ७ सदस्यीय समितीची स्थापना

शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी ...

September 10, 2024 8:49 AM

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश

मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थि...

September 9, 2024 8:14 PM

कर्करोगावरची औषधं आणि नमकीन पदार्थांवरच्या जीएसटीमध्ये कपात

कर्करोगावरच्या औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन ५ टक्के करण्याचा निर्णय आज झाला. नमकीन आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. जीएसटी परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत ह...

September 9, 2024 8:09 PM

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणमधल्या कंत्राटी कामगारांना १९ टक्के वेतनवाढ

महाराष्ट्राच्या विविध भागातल्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू केली आहे.  या कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत फडनवी...

September 9, 2024 7:49 PM

सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांच्या २४० इंजिनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये करार

सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांच्या इंजिनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं हिंदुस्तान एअरोनॉटिक्स बरोबर करार केला आहे. २६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची ही २४० एएल- ३१ एफपी इंजिनं कोरापूट इथल्या कारखान्यात तयार होणार आहेत. वर्षाला ३० याप्रमाणे पुढच्या ८ वर्षात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स २४० इंज...