September 25, 2024 7:41 PM

लातूर जिल्ह्यातल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग

लातूर जिल्ह्यातल्या धनेगाव इथल्या मांजरा धरणातून विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  धऱणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेत विसर्ग कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.  दरम्यान, ...

September 25, 2024 7:05 PM

मुंबई पालिकेच्या प्रशासकीय विभाग कार्यालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आखाव्‍यात – आयुक्त भूषण गगराणी

मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक गरजेनुसार  उपाययोजना आखाव्‍यात, आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. ‘वातावरणीय बदल : हरित दृष्टिकोन विकसि...

September 25, 2024 7:02 PM

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं ८५ हजारांची पातळी ओलांडली

जागतिक बाजारातल्या तेजीमुळं देशातल्या दोन्ही शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स पहिल्यांदाच ८५ हजारांच्या वर आणि निफ्टी पहिल्यांदाच २६ हजारांच्या वर जाऊन बंद झाले. घसरणीसह सुरू झालेल्या शेअर बाजारात अखेरच्या अर्धा तासात जोरदार तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स २५६ अंकांची तेजी नोंदवून...

September 25, 2024 7:01 PM

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन

जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि संच मान्यतेचा जाचक अटी रद्द करणे या प्रमुख मागण्यांसाठी आज सोलापुरात शिक्षकांनी मोर्चा काढला. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटनांनी हा मोर्चा काढला.  गडचिरोली, धाराशिव, वाशिम या जिल्ह्यातही शिक्षकांनी आज आंदेलन केल्य...

September 25, 2024 8:04 PM

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान

जम्मू - काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज २६ जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झालं. २३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.  या मतदारसंघांतल्या एकूण ३ हजार ५०२ मतदान केंद्रांवर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. जम्मू प्रांतात रिआसी, राजौरी आणि पूँछ तर ...

September 25, 2024 8:28 PM

उद्या राज्यातील काही जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी  आणि पुणे या जिल्ह्यांसाठी उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाची दाट शक्यता असून उदया नाशिकमधे रेड अलर्ट दिला आहे. येत्या दोन दिवसांत पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आ...

September 25, 2024 3:42 PM

वाशीम जिल्ह्यात स्वछता अभियानांतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

स्वछता अभियान २०२४ अंतर्गत वाशीम जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या भुली इथल्या ग्रामस्वच्छता महिला मंडळाने अयोध्येत श्री रामजन्मभूमी इथे शरयू नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात ५१ महिलांनी सहभाग...

September 25, 2024 3:41 PM

महाराष्ट्रात वाढवण आणि ग्रेट निकोबार बेटावर नवीन बंदरं विकसित होणार – मंत्री सर्वानंद सोनोवाल

महाराष्ट्रात वाढवण आणि ग्रेट निकोबार बेटावर गालाथी खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत असल्याचं केंद्रीय बंदरविकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं. नवीन सरकारचा १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त ते वार्ताहरांशी बोलत होते. या बंदरांच्या निर्मितीनंतर देशात मोठ्या...

September 25, 2024 3:17 PM

धुळ्यात मराठा आंदोलकांचं मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलकांनी आज धुळे शहराजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर रास्तारोको केलं. आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली. रास्तारोकोमुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी...

September 25, 2024 3:09 PM

बिहारच्या मारहोरा इथं रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात – रेल्वे मंत्रालय

बिहारच्या मारहोरा इथे सुरू असलेल्या रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. वेबटेक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड आणि भारतीय रेल्वे यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या प्रकल्पातून आफ्रिकेत रेल्वे इंजिनाची निर्यात करण्यात येईल. पुढच्या वर...