September 11, 2024 8:06 PM

व्हिएतनाममध्ये यागी वादळामुळं १७९ नागरिक ठार, हजारो नागरिकांना वाचवण्यात यश

व्हिएतनाममध्ये झालेल्या  यागी वादळामुळं १७९ नागरिक ठार झाले असून  हजारो नागरिकांना वाचवण्यात आलं आहे. यागी हे आशिया खंडातलं  सर्वात  विनाशकारी वादळ ठरलं असून त्यामुळं भूस्खलन होत आहे. या वादळामुळं सोसाट्याच्या वाऱ्यांसह  जोरदार  पाऊस  पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळं व्हिएतनाम मधल्या प्रांतातला एक ...

September 11, 2024 8:32 PM

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यां...

September 11, 2024 6:29 PM

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ची चौथी यादी जाहीर

आप अर्थात आम आदमी पार्टीनं आज हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून  त्यात २१ उमेदवारांचा  समावेश आहे. या पक्षानं सोनिपतमधून देवेंदर गौतम, गुरगावमधून निशांत आनंद,  अंबाला मधून राज कौर गिल तर कर्नाल मधून सुनील बिंदल यांना उमेदवारी दिली आहे. 

September 11, 2024 6:25 PM

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेला प्रारंभ

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेला आज नवी दिल्लीत केंद्रीय मत्स्य उद्योग मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते प्रारंभ झाला. सगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या भागातल्या मच्छीमार समाजाला संघटित क्षेत्रात परावर्तित करण्यासाठी  या डिजिटल व्यासपीठचं सदस्य होण्याकरिता प्रवृत्त ...

September 11, 2024 6:14 PM

राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ

राष्ट्रीय छात्र सेना योजनेसाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. माध्यमिक,उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेत सहभागी होत असतात. या सेनेच्या कनिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ८ महिन्यांसाठी आणि वरिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ६ महिन्यां...

September 11, 2024 6:12 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान अशी निराधार आणि दिशाभूल करणारी वक्तव्यं करणं हे लज्जास्पद असून देशाच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारं आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. भारतात शिख समुुदायाला त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाचं पालन करू दि...

September 11, 2024 6:06 PM

लातूर शहरात भूकंपाची नोंद नाही

लातूर शहरातल्या विवेकानंद चौक परिसरात आज सकाळी भूगर्भातून आवाज झाला. त्यामुळे शहराला भूकंपाचा धक्का झाल्याची चर्चा होऊ लागली. जिल्हा प्रशासनानं यासंदर्भात नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडे चौकशी केली. मात्र भूकंप मापन केंद्रात भूकंपाची कसलीही नोंद झाली नसल्याचं समजलं. नागरिकांनी घाबर...

September 11, 2024 6:04 PM

पालघरमध्ये ग्रामीण भागात आदिवासी कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त

पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायातील कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त ठरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किमान या अभियानाच्या माध्यमातून का होईना पण ग्रामीण आणि शहरी भागातल्या माता आणि बालकं आता पोषक आहार घेऊ लागले आहेत.  वळणपाडा अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातल्या ...

September 11, 2024 3:37 PM

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशाभरातल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं देशाभरातल्या  तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्यातून  पहिली रेल्वेगाडी  अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वेगाडी  नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून, यासाठी आवश्यक ती सर...

September 11, 2024 3:50 PM

मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला.     मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतक...