September 11, 2024 8:02 PM

राहुल गांधी यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत आहे – नाना पटोले

राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे”, ही भूमिका असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपानं...

September 11, 2024 7:53 PM

राष्ट्रीय जनता दल झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया महायुतीत सामील होणार

झारखंडमधल्या  विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलानं इंडिया महायुतीत सामील व्हायचं ठरवलं आहे.  आरजेडीच्या नेत्यांच्या  रांची इथं आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस आणि  झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करून आरजेडी आपल्या उमेदवारांची नावं निश्चित करणार आहे. आरजेडीच्या ...

September 11, 2024 8:26 PM

तेलंगणा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची केंद्रीय समिती पाहणी करणार

तेलंगणा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सहा सदस्यीय केंद्रीय समिती लवकरच पाहणी करणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव कर्नल कीर्ती प्रताप सिंग हे या समितीचं नेतृत्व करतील. समितीनं आज सकाळी हैदराबाद इथल्या सचिवालयातल्या जेष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी आणि तेलंगणा राज्...

September 11, 2024 7:36 PM

ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणं करता यावा, या उद्देशानं तयार केलेल्या  ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं.  आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारां...

September 11, 2024 7:32 PM

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे   राऊज ॲव्हन्यू न्यायालयातील सुनावणीसाठी तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना हजर केलं....

September 11, 2024 7:29 PM

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची नियुक्ती केली आहे.  या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेत आज सामंजस्‍य करार...

September 11, 2024 7:01 PM

सोयाबीन, कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसंच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल

सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली.   विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज...

September 11, 2024 6:49 PM

भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही – गृहमंत्री अमित शाह

भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर त्यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, असं ते म्हणाले.  देशाचं विभाजन कर...

September 11, 2024 8:32 PM

राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील आशा बावणे यांचा समावेश आहे.   केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १९७३ मध्ये राष्ट्रीय फ्लोरे...

September 11, 2024 6:42 PM

देशाच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमाप्रांत विकासविषयक परिषदेत ते बोलत होते. देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या ...