September 12, 2024 7:02 PM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स विक्रमी उंचीवर

जागतिक बाजारातल्या सकारात्मक वातावरणाचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारांमधे उमटले आणि बाजार नव्या उच्चांकावर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं एक हजार ४३९ अंकांची झेप घेतली आणि तो दिवसअखेर ८२  हजार  ९६२ या विक्रमी पातळीवर  बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४७० अंकाची वाढ  नोंदवत २५ ह...

September 12, 2024 6:04 PM

पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकने १५ सप्टेंबरपर्यंत खुली

२०२५ च्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. यंदा एक मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्ज करायचे आहेत. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान किंवा सेवा दिलेल्या व्यक्तींविषयीचा सर्व तपशील अर्जासोबत कमाल ८०० शब्दांत जोडावा, असं आवाहन ...

September 12, 2024 5:55 PM

भाग्यश्री आत्राम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात प्रवेश

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष यांनी आज अहेरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते. भाग्यश्री आत्राम या अजीत पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्...

September 12, 2024 8:24 PM

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. श्वासलिकेत संसर्ग झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मागच्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षण प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. आज दुपारी तीन वा...

September 12, 2024 3:25 PM

उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात जमीन, वास्तू आणि बँक खात्यांमधल्या मुदत ठेवींचा समावेश आहे. १ हजार ४३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या फसवणूक प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. उषदेव इंटरनॅशनलनं अने...

September 12, 2024 3:25 PM

राज्यातली प्रमुख धरणं ९० ते ९५ टक्के भरली

राज्यातली प्रमुख धरणं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्के भरली आहेत. मराठवाड्यात जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापुरात उजनी धरण १०० टक्के आणि साताऱ्यातलं कोयना धरण ९९ टक्के भरलं आहे. पुणे आणि कोकणातली ९७ टक्के धरणं पूर्ण भरली असून, मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यातली धरणंही ९५ ते १०० टक्के नागपूर विभाग...

September 12, 2024 3:11 PM

ठाणे जिल्ह्यात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार

ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसंच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हे मंदिर उभारण्यात ...

September 12, 2024 3:17 PM

रायगड जिल्ह्यात रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये आज सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहाेचला. यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं. घटनास्थळी अग्निशामक दलाकडून बचावकार्य ...

September 12, 2024 3:35 PM

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ७० हजार कोटींहून अधिक खर्चाचे रस्ते बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं २०२४-२५ ते २०२८-२९ या आर्थिक वर्षांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्याचा ग्रामविकास खात्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या योजनेचा एकंदर खर्च ७० हजार १२४ कोटी रुपये इतका असणार आहे. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमा...

September 12, 2024 1:50 PM

‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन

‘मुंबई महानगर क्षेत्रः  जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन होणार आहे.  यावेळी MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकारण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात दुपारी साडेतीन वाजता हा कार्...