September 13, 2024 9:35 AM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

रशियातील सेंट पिटर्स बर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादी मीर पुतीन यांची भेट घेतली. याबाबत रशियाच्या भारतातील दूतावसाने एक निवेदन प्रसिद्ध केल असून त्याबाबत माहित...

September 13, 2024 9:16 AM

केंद्र सरकारनं ‌ऊस नियंत्रण आदेश 1966 मध्ये काही बदल सुचवून त्यावर सर्व संबंधितांकडून मागविल्या सूचना आणि हरकती

केंद्र सरकारनं ‌ऊस नियंत्रण आदेश 1966 मध्ये काही बदल सुचवून त्यावर सर्व संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. तसंच या कायद्यातील प्रस्तावित बदलांनंतर साखर नियत्रंण आदेश 2024 असा नवा कायदा घोषित केला जाणार आहे. त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष...

September 13, 2024 9:12 AM

राज्यभरात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

राज्यभरात घरोघरी विराजमान झालेल्या गणपतीबाप्पांचं आणि माहेरवाशिणी गौरीचं काल भावपूर्ण वातावरणात आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' असा आग्रह धरत विसर्जन करण्यात आलं. गणेश विसर्जनसाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. पुण्यात महापालिकेनं 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 42 बांधीव हौद आणि 265 ठ...

September 13, 2024 9:01 AM

जायकवाडी धरणाच्या विसर्गात कपात

पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरणाचा पाणीसाठी साडे ९८ टक्क्यांवर गेल्यानं तसंच पाण्याची आवक सुरू असल्यानं, धरणाच्या १८ दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरणाच्या सहा दरवाजातून सुमारे तीन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात ये...

September 13, 2024 10:55 AM

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या कार्यक्...

September 13, 2024 8:52 AM

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सर...

September 13, 2024 9:31 AM

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थोमस ग्रीन फील्ड यांनी याबाबत सांगितल की संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प...

September 12, 2024 8:22 PM

केरळमध्ये बिगर भाजपशासित पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या एक दिवसीय संमेलन

देशाचे दरडोई उत्पन्न आणि विकासाच्या विविध स्तरानुसार राज्यांमध्ये करांचे संतुलित वितरण व्हावं, अशी अपेक्षा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी व्यक्त केली आहे. ते आज केरळमधे तिरूअनंतपूरम इथं आयोजित बिगर भाजपशासित पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या एक दिवसीय संमेलनात बोलत होते. यावेळी तेलंगणा, कर्ना...

September 12, 2024 8:19 PM

महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असून त्यामुळे महिलांना स्वाभिमानानं जगणं शक्य होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत कोईमतूर इथं एका कल्याणकारी योजनेअंतर्गत गरजू महिलांना शिवण यंत्रांचं वाटप केल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजन...

September 12, 2024 8:16 PM

मध्य प्रदेशात भिंत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातल्या दतिया जिल्ह्यात आज सतत होणाऱ्या पावसामुळं भिंत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात आलं आहे. खालकापुरा परिसरात राजगड किल्ल्याची ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्यानं ही दुर्घटना झाली. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला ...