September 13, 2024 1:09 PM

कमला हॅरिस यांच्यासोबत आणखी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये सहभागी न होण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासह राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रेसिडेंन्शियल डिबेट अर्थात वादविवादात सहभागी होणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. फिलाडेल्फियामध्ये झालेल्या सुरुवातीच्या वादविवादात विजयी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आणि महत्त्वाच्य...

September 13, 2024 12:38 PM

जम्मू आणि काश्मीर : पूंछमध्ये एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक

जम्मू आणि काश्मीरमध्ये, पूंछ जिल्ह्यात सुरनकोटच्या पोथा बायपास इथं सुरक्षा दलांनी काल संध्याकाळी जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स संघटनेच्या एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक केली. प्राथमिक तपासात त्याची ओळख दर्याला नौशेरा इथला रहिवासी मोहम्मद शाबीर अशी झाली आहे. तो पाकव्याप्त काश्मीर इथल्...

September 13, 2024 12:33 PM

भेसळयुक्त मिठाई, मसालेदार आणि दुग्धजन्य पदार्थांवर कडक नजर ठेवण्याचे FSSAI चे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, मसालेदार आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती मोठ्या प्रमाणावर होतात. याला आळा घालण्याचे आणि विक्रीवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश FSSAI, अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठ...

September 13, 2024 12:29 PM

प्रगत प्रोसेसर सह-विकसित करण्यासाठी आयबीएम आणि एल अँड टी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात करार

आधुनिक उपकरणं, संकरीत तंत्रज्ञान प्रणाली, गतिशीलता, उद्योग, ऊर्जा आणि सर्व्हर सारख्या क्षेत्रात प्रगत प्रोसेसर सह-विकसित करण्यासाठी आयबीएम आणि एल अँड टी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात काल करार झाला. केंद्रीय  माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर ...

September 13, 2024 12:15 PM

पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पदकविजेत्या आणि इतर स्पर्धकांचं त्यांनी अभिनंदन केलं. या दिव्यांग खेळाडूंचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसाठीच एक मोठी शक...

September 13, 2024 11:54 AM

सेनेगलचे अध्यक्ष बसीरो दिओमाये फाये यांनी संसद केली विसर्जित

सेनेगलचे अध्यक्ष बसीरो दिओमाये फाये यांनी संसद विसर्जित केली आहे. यामुळं आता निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेनेगलच्या घटनेनुसार ९० दिवसात निवडणुका होणे अपेक्षित आहे. दूरचित्रवाणीवरुन प्रसारित केलेल्या भाषणात फाये यांनी ही घोषणा केली. विद्यमान संसदेत त्यांच्या विरोधी पक्षाला बहुमत होतं. कार...

September 13, 2024 11:46 AM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली

कोलकाता आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न...

September 13, 2024 1:30 PM

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला ९ सुवर्णपदकं

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या थाळीफेक प्रकारात अनिशा हिने ४९ मीटर ९१ सेंटीमीटरचं विक्रमी अंतर गाठत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. याच स्पर्धेत अमानत कंबोज हिने ४८ मीटर ३८ सेंटीमीटर थाळीफेक करत रौप्यपदक जिंकलं. ...

September 13, 2024 10:18 AM

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे डायमंड लीग फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. यंदा डायमंड लीगमधील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे स्पर्धेत हे क्रिडापटू विजयासाठी लढत देतील. सध्या 14व्या क्रमांक...

September 13, 2024 1:24 PM

रशियन सैन्यातून 35 भारतीय नागरिकांची सुटका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर 35 भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली. मोदी यांच्या भेटीपूर्वी १० भारतीय नागरिकांना सोडण्यात आलं होतं. त्यामुळं सुटका झालेल्या भारतीयांची एकूण संख्या ४५ वर पोहो...