September 13, 2024 3:04 PM

पश्चिम बंगालमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ईडीचे छापे

अन्न पुरवठा आणि वितरण भ्रष्टाचार प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली  संचालनालयानं आज पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि कोलकाता यासह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. विविध गोदामं, रास्त भाव दुकाने आणि रेशन विक्रेत्यांच्या घरांची तपासणी सुरू आहे.

September 13, 2024 3:00 PM

अल्जीरियात भारताचे राजदूत म्हणून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांची नेमणूक

अल्जीरियात भारताचे राजदूत म्हणून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ स्वाती विजय कुलकर्णी यांची नेमणूक झाली आहे. त्या परराष्ट्र सेवेच्या १९९५ च्या तुकडीतल्या अधिकारी असून सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.

September 13, 2024 2:54 PM

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांची नवी मुंबई पालिकेला भेट

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना एका सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक कार्याची आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. डॉ.वावा यांनी महानगरपालिकेच्...

September 13, 2024 2:46 PM

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या २५० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या २५० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. या निधीतून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या सर्व १ हजार ३३३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या शाळांम...

September 13, 2024 2:32 PM

किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ

देशाच्या किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये तीन पूर्णांक सहा दशांश टक्के असलेला हा दर ऑगस्टमधे तीन पूर्णांक ६५ शतांश  टक्के झाला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली.  गेल्या पाच वर्षातला हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्...

September 13, 2024 1:28 PM

पाश्चिमात्त्य देश रशिया-यूक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत – रशिया राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन

युक्रेनला लांबवर हल्ला करणारी शस्त्रास्त्रं पुरवून पाश्चिमात्त्य देश रशिया-यूक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन रशियाला पुढचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असं पुतीन रशियन स्टेट टीव्ही या वृत्तवाहिनीश...

September 13, 2024 1:20 PM

अ‍ॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचे आढळले

अ‍ॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट या ई काॅमर्स कंपन्या काही निवडक कंपन्यांना पसंती देऊन गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचं भारतीय स्पर्धा आयोगाच्या निदर्शनाला आलं आहे. आयोगानं एका अहवालात या तपासाबद्दल माहिती दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी काही निवडक कंपन्यांनाच उच्च मानांकन दिलं असून ग्राहक एखादी ...

September 13, 2024 1:22 PM

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे. आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार ७० वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील. ही योजना एका आठवड्यात सुरु होईल अशी अपेक्षा असून यासाठी पात्र व्...

September 13, 2024 3:06 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. ईडी अर्थात सक्त वसुली संचलनालयाच्या प्रकरणात त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. ईडीनं त्यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सीबीआयनं...

September 13, 2024 1:16 PM

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. रशिया मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या एका बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि  चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य आणि ...