September 26, 2024 9:29 AM

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती ...

September 26, 2024 9:05 AM

चिकनगुनियाची वाढती संख्या रोखण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

पुण्यासह राज्यभरात चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिकुनगुन्याच्या विषाणूत झालेला बदल तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात क्रमनिर्धारण करण्यासाठी सरकारी आणि खा...

September 26, 2024 8:49 AM

पुण्यात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प, आजही अतिवृष्टिचा इशारा

पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं. प्रचंड वाहतुक कोंडीमुळं लोकांचे तासनतास रस्त्यावरच गेले. आजही पुणे शहर आणि परिसराला अतिवृष्टिचा लाल बावटा फडकवण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी च...

September 25, 2024 8:31 PM

गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त प्रवासी शामलाजी इथे देवदर्शनासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर त्यांची गाडी भरधाव वेगात ट्रेलरवर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला.

September 25, 2024 8:23 PM

सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूकीमुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य झालं आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्य...

September 25, 2024 8:13 PM

प्रमुख पिकांच्या उत्पादनाचं अंतिम अनुमान कृषी मंत्रालयाकडून प्रसिद्ध

सन २०२३-२४ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचं अंतिम अनुमान कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार यावर्षी ३३ कोटी २२ लाख टन इतकं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २६ लाख टनांनी हे उत्पादन जास्त असेल. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ह...

September 25, 2024 8:05 PM

क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या दोन खेळाडूंना पहिल्या दहा खेळाडूत स्थान

कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे. चेन्नईत बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. 

September 25, 2024 7:57 PM

तेलाच्या दरात सुमारे २ टक्के घसरण

कच्च्या तेलाचा सगळ्यात मोठा आयातदार असलेल्या चीनचा आर्थिक विकास आराखडा तिथल्या अर्थव्यवस्थेला  चालना देण्यासाठी सक्षम ठरेल का या बाबतच्या उलटसुलट चर्चांमुळे आज तेलाच्या दरात सुमारे दोन टक्के घसरण झाली. जागतिक बाजारात आज तेलाचा दर ७३ डॉलर ७१ सेंट प्रतिबॅरल इतका राहिला.

September 25, 2024 7:52 PM

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चौकशी लोकायुक्त पोलिसांनी करावी – न्यायालय

मैसूरू शहर विकास प्राधिकरण जमीन प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चौकशी लोकायुक्त पोलिसांनी करावी, असे आदेश एका विशेष न्यायालयानं दिले आहेत. मैसूरूच्या लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणी २४ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, असंही न्यायाधीश संतोष भट यांनी आदेशात सांगितलं. सिद्धरामय्या यांच्...

September 25, 2024 7:44 PM

आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवादाची गरज – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

देशातल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवाद असण्याची गरज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री जाधव यांनी नॅशनल हेल्थ मिशनची बैठक ...