September 13, 2024 8:35 PM

लडाख झंस्कार महोत्सव २०२४ला प्रारंभ

जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात साजरा होणाऱ्या लडाख झंस्कार महोत्सव २०२४ला सानी या गावातून प्रारंभ झाला. लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात या भागातल्या वैविध्यपूर्ण परंपरा दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोज...

September 13, 2024 8:38 PM

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या डोडा इथं सभा

जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सभा घेणार आहेत. जम्मू कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भाजपच्या रॅलीला ते संबोधित करतील. या भागातल्या तीन जिल्ह्यांत १८ सप्टेंबर रोजी मतदान होईल. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सर्व...

September 13, 2024 8:18 PM

शिक्षण समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षण म्हणजे केवळ पदवी नसून समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम आहे, असं प्रतिपदान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. ते आज राजस्थानमधल्या अजमेर इथं केंद्रीय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात उच्च शिक्षणाची भूमिका महत्वपू...

September 13, 2024 8:15 PM

नौदलासाठी तयार केलेल्या VLSRSAM क्षेपणास्त्राची चाचणी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी

नौदलासाठी तयार केलेल्या VLSRSAM क्षेपणास्त्राची चाचणी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी झाली. जमिनीवरुन हवेत मारा करु शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची ओदिशात चंडीपूर इथं कालही एक चाचणी झाली.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कामगिरीबद्दस संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओचं अभिनंदन केलं.  या क्षेपणास्त्रा...

September 13, 2024 8:13 PM

५ अब्ज २५ कोटी डॉलरची वाढ होऊन देशाचा परकीय चलन साठा विक्रमी पातळीवर

देशाच्या परकीय चलन साठ्यात ५ अब्ज २५ कोटी डॉलरची वाढ होऊन तो  ६८९ अब्ज २३ कोटी डॉलरच्या विक्रमी स्तरावर पोहचला, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. गेल्या शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात दरम्यान, परदेशी चलन साठ्याचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या परदेशी चलन मालमत्तेत देखील ५ अब्ज ११ कोटी डॉलरची वाढ हो...

September 13, 2024 7:35 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव इथं महिला सशक्तिकरण अभियानाचं उद्घाटन करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी धाराशीव जिल्ह्यातल्या परंडा इथं महिला सशक्तिकरण अभियानाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह़यातल्या १० यशस्वी महिलांचा सत्कार केला जाणार आहे.तसंच विविध विभागाअंतर्गत ९ महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात...

September 13, 2024 7:31 PM

राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचं आंदोलन

लोकसभतले विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या  आरक्षणा संदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.     हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे , माजी आमदार गजानन घुगे यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन...

September 13, 2024 7:17 PM

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं पीयूष गोयल यांच्या हस्ते अनावरण

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलच अनावरण पीयूष गोयल यांनी आज मुंबईत केलं. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांना याद्वारे प्रशासनासोबत थेट आणि पारदर्शकरित्या संवाद साधता येणार आहे. चहा, कॉफी, मसाले, रबर महामंडळ, अपेडा, परदेश व्यापार महासंचलनालय यांच्यासारख्या मंत्रालयाअंतर्गत ...

September 13, 2024 7:09 PM

सनदी अधिकाऱ्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई

संजीव हंस या सनदी अधिकाऱ्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं गेल्या ३ दिवसात ५ ठिकाणी छापे टाकले. मुंबईसह दिल्ली आणि कोलकत्यात टाकलेल्या या छाप्यात सुमारे दीड कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.

September 13, 2024 8:38 PM

पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार

पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. चीनमधल्या मोकी इथल्या मैदानावर होणारा हा सामना, या स्पर्धेतला भारताचा पाचवा सामना आहे. यापूर्वी भारतीय संघानं चीनला ३-०, जपानला ५-१, मलेशियाला ८-१ आणि कोरियाला ३-१ असं नमवलं आहे. गुणतालिकेत पहिलं स्थानी असलेल्या ...