September 14, 2024 7:49 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ओणमनिमित्त शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओणमनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. केरळमधला हा सुगीचा सण समृद्ध परंपरेचं आणि सांस्कृतिक वारशाचा निदर्शक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या संदेशात अन्नदाता शेतकऱ्यांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

September 14, 2024 7:22 PM

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ

शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन शासनानं केलं आहे.   राज्याच्...

September 14, 2024 7:13 PM

धुळ्यात लाडकी बहिण योजना कुटुंब भेट अभियानाला सुरूवात

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अधिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना कुटुंब भेट अभियानाची सुरुवात केली आहे.  या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुंटुंबाना भेट देऊन महिलांच्या अडचणी आणि समस्या सोडवणं हा या अभियानाचा उद्देश आहे.  या अभियानाला धुळे शहर आणि जिल्ह्यात देखील सुरुवात झाली...

September 14, 2024 6:55 PM

IFFI २०२४ मध्ये तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन विभाग

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच ईफ्फीमध्ये नवोदित तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक नवीन विभाग सुरू केला आहे. "सर्वोत्कृष्ट नवोदित  भारतीय चित्रपट विभाग २०२४" असे या विभागाचे नाव आहे. या नव्या दालनात ईफ्फी चित्रपट महोत्सव यंदा २० नोव्हेंबर ते ...

September 14, 2024 7:44 PM

नागपुरात गरजू विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वितरित

दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवल्यानं आपल्याला समाधान मिळतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूर इथं आधार संस्था आणि वेकोलिच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वितरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आपण आतापर्यंत ४० हजार ...

September 14, 2024 8:34 PM

महायुतीचं सरकार महिला, शेतकरी, युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महायुतीचं सरकार महिला, शेतकरी, युवक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात आज ते बोलत होते. शासनानं सुरू केलेली लाडकी बहिण योजना यशस्वी झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्र...

September 14, 2024 6:29 PM

मुंबई विमानतळावर गेल्या २ दिवसात साडेसात किलो सोनं जप्त

मुंबई विमानतळावरुन गेल्या दोन दिवसात तस्करी करुन आणलेलं साडेसात किलो सोनं जप्त करण्यात आलं असून त्याची बाजारातली किंमत ५ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती विमानतळ झोन ३ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोने तस्करीच्या एकूण ७ प्रकरणांमध्ये ही जप्ती करण्यात आली असून या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात ...

September 14, 2024 8:35 PM

नाशिकच्या बाजारात कांद्याचे दर वधारले

कांद्याच्या निर्यातीवर किमान दर मर्यादा हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे  दर क्विंटल मागे ४०० ते ५०० रुपयांनी वधारले आहेत. लासलगाव बाजारात आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी केंद्र सर...

September 14, 2024 7:09 PM

कच्च्या खाद्य तेलावर २० टक्के आणि सूर्यफुलाच्या तेलावर ३२ टक्के आयात शुल्क लागू

केंद्र सरकारनं कच्च्या  खाद्य तेलावर २० टक्के आणि सूर्यफुलाच्या तेलावर ३२ टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या तेलांवर या पुढे ३५ टक्के आयात शुल्क द्यावं लागणार आहे. या बरोबरच अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्यावर्षी लागू केलेले ब...

September 14, 2024 6:12 PM

जागतिक बांबू दिनानिमित्त १८ सप्टेंबरला मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये विशेष परिसंवादाचं आयोजन

बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशानं १८ सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्तानं महाराष्ट्र राज्य सरकार आणि लातूरच्या फिनिक्स फाऊंडेशनतर्फे मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये विशेष परिसंवादाचं आयोजन केलं आहे.    चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृह...