September 15, 2024 2:58 PM

एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज – गृहमंत्री अमित शहा

दहशतवाद विरोधातली संरचना बळकट करण्यासाठी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेत बोलत होते.   जम्मू-काश्मीर, क...

September 15, 2024 2:45 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

आज अभियंता दिन, देशाचे महान अभियंता सर एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची प्रगती, नवनिर्मिती आणि नव्या आव्हानांचा सामना करण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे त्य...

September 15, 2024 2:43 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओणम निमित्त दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओणमनिमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम चा सण सर्वांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि उत्साह घेऊन येवो अशी कामना प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या आपल्या संदेशात केली आहे. ओणम हा केरळच्या  गौरवशाली संस्कृतीचा सण असून मल्याळी बांधव जगभरात हा सण मोठया उत्स...

September 15, 2024 8:16 PM

दूरदर्शनची ६५ वी गौरवरशाली वर्षपूर्ती

देशातील प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेलं दूरदर्शन आज आपली ६५  गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. १५  सप्टेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्या दिवशी दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचं उद्घाटन केलं होतं. १९७५  पर्यंत ...

September 15, 2024 1:39 PM

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चौप्राला रौप्य पदक

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीगचं सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक नीरज चोप्रानं पटकावलं. नीरजनं ८७ पूर्णांक ८६ मीटर अंतरावर भाला फेकला, त्याचं सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरनं हुकलं. या स्पर्धेत अँडरसन पीटर्स सुवर्ण तर जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं कांस्य पदक पटकावलं.

September 14, 2024 8:29 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातल्या ४३४ आयटीआय संस्थांमधे उभारण्यात आलेल्या संविधान मंदिरांचं उद्घाटन करणार आहेत. उद्या दुपारी उपराष्ट्रपती नागपूर इथं पोहोचतील. नागपूरच्या रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणा...

September 14, 2024 8:17 PM

रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यम ‘आरटी’वर अमेरिकेत घातलेल्या निर्बंधांचा रशियाकडून निषेध

रशियच्या सरकारी प्रसारमाध्यम आर टी वर अमेरिकेत घातलेल्या निर्बंधांचा रशियानं निषेध केला आहे. मॉस्कोमध्ये आज झालेल्या ब्रिक्स मिडिया शिखर परिषदेत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोव्हा यांनी आरटी  आणि रशियाच्या प्रसारमाध्यमांवर घातलेले निर्बंध हे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. अम...

September 14, 2024 8:08 PM

महाराष्ट्रात पुन्हा एनडीएचं सरकार आणण्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं आवाहन

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पुन्हा एनडीएचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे. नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य...

September 14, 2024 8:02 PM

विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी हरियाणाचा विकास महत्त्वाचा आहे – प्रधानमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ कुरुक्षेत्र इथे जाहीर सभा घेऊन केला. विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी हरियाणाचा विकास महत्त्वाचा आहे, त्यादृष्टीनं सरकारनं हरियाणाला विकासाच्या प्रवाहात आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब, महिला, शेतकरी...

September 14, 2024 8:19 PM

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय अधोरेखित करत अशा निर्णयांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसंच ग्रामीण भागात अधिक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या...