September 15, 2024 8:18 PM

बेल्जियन इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिची एकेरीतल्या अजिंक्यपदाला गवसणी

भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिनं बेल्जियन इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्यावहिल्या एकेरी अजिंक्यपदाला गवसणी घातली. १७ वर्षांच्या अनमोल हिनं डेन्मार्कच्या ॲमेलिया शुल्ज हिच्यावर २४-२२, १२-२१, २१-१० अशी मात केली.

September 15, 2024 3:47 PM

वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्राचं लोकार्पण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेमध्ये वेंगुर्ले नगर परिषद आणि बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या सहयोगातून उभारलेल्या बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्राचं काल लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक ...

September 15, 2024 3:41 PM

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने पिकांची नासधूस केल्याने भातशेतीचं नुकसान झालं आहे. या कळपात २८ रानटी हत्ती असून ते कुरखेडा, आरमोरी, शंकरनगर, पाथरगोटा या भागात त्यांनी नुकसान केलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्यात येईल, असं वनविभागाने म्हटलं आहे. हे हत्ती सध्या वैराग...

September 15, 2024 3:36 PM

वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचं निधन

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधले प्रसिद्ध वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. त्यांनी चिपळूण इथे डोंगरावर जैवविविधतेने समृद्ध असलेला वनीकरण प्रकल्प साकारला होता. वाट चुकलेल्या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी ते प्रयत्नशील होते...

September 15, 2024 6:46 PM

केंद्रातलं आणि राज्यातलं सध्याचं सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका शरद पवार यांची टीका

केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज धुळे जिल्ह्याल्या शिंदखेडा इथं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला  शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणं राज्यात मह...

September 15, 2024 6:33 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आज केली. दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातुन बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द...

September 15, 2024 3:21 PM

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ३० भारतीय महिलांना भारतीय महिला दुबई पुरस्कार प्रदान

संयुक्त अरब अमिरातीच्या उत्कर्षात विशेष योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातल्या भारतीय महिलांचा सन्मान करणारा भारतीय महिला दुबई पुरस्कार २०२४ काल दुबईमध्ये पार पडला. तंत्रज्ञान, नवउद्योजकता आरोग्यसेवा आणि कला या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ३० महिलांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.  या कार्यक्...

September 15, 2024 3:11 PM

रशिया आणि युक्रेननं संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले

रशिया आणि युक्रेननं त्यांच्यात सुरु असलेल्या संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले आहेत. कुर्स्क प्रदेशात पकडलेल्या एकशे तीन रशियन सैनिकांची, एकशे तीन युक्रेनियन युद्धकैद्यांच्या बदल्यात सुटका करण्यात आली आहे, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. युनायटेड अरब अमिरात...

September 15, 2024 3:02 PM

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात भारताचा विजय

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या चौथ्या फेरीत भारतीय संघाने खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात विजय मिळवला. खुल्या गटात भारतानं सर्बियाचा पराभव केला, तर महिला संघानं फ्रान्सवर विजय मिळवला. आज पाचव्या फेरीत महिला संघाचा सामना कझाकिस्तानशी तर खुल्या गटात अझरबैजानसोबत ...

September 15, 2024 2:56 PM

मेरठ इथं इमारत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथल्या झाकीर कॉलनीत काल इमारत कोसळून झालेल्या अपघातानंतर सुरु केलेलं मदत कार्य आज सकाळी पूर्ण झालं. आज या ढिगाऱ्यातून ५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी हे मदतकार्य केलं.  ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत १५ जण होते. अश...