September 15, 2024 7:54 PM

छत्तीसगडमधे चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या ५ जणांची हत्या

छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या पाच जणांची आज हत्या करण्यात आली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. कोंटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ईटकला गावात हा प्रकार घडल्याचं समजल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथक घटनास्थळी पोचलं. याप्रकरणी त्यांनी पाच जणांना अटक के...

September 15, 2024 7:52 PM

राष्ट्रपतींनी मिलाद उन नबीनिमित्त दिल्या शुभेच्छा

देशभरात उद्या साजऱ्या होणाऱ्या मिलाद उन नबीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुस्लीम समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषिद मोहम्मद यांचा जन्मदिवस मिलाद उन नबी म्हणून साजरा केला जातो. पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं. त्यांनी समाजात समानता आणि ...

September 15, 2024 7:48 PM

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा झारखंडला मोठा धोका – प्रधानमंत्री

संथाल परगणा आणि कोल्हान भागातली लोकसंख्येची स्थिती झपाट्याने बदलत आहे, इथल्या आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे तर घुसखोर वाढत आहेत, या भागाला रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा धोका आहे अशी चिंता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज जमशेदपूर इथं आयोजित परिवर्तन महामेळाव्याला संबोध...

September 15, 2024 7:14 PM

अभियंता दिनानिमित्त नागपूरमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान

अभियंता दिनानिमित्त आज नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अभियंते, वास्‍तुशास्‍त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्‍का...

September 15, 2024 7:08 PM

नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उपराष्ट्रतींच्या हस्ते उद्घाटन

  नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उद्घाटन उपराष्ट्रती जगदीप धनखड यांनी केलं. विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्हे, तर तंत्रज्ञानातल्या संधींचा शोध घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक, विज्ञान, आणि अभियांत्रिकीसाठी आधुनिक तंत्रज...

September 15, 2024 8:03 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला ६ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा

सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केला असून गरीब, आदिवासी, दलित, वंचित, मागासवर्गीय, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, असं प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या झारखंड दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आ...

September 15, 2024 6:45 PM

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावात पाणी शिरलं आहे आणि शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्र्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे न...

September 15, 2024 8:14 PM

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिर्डी इथं पेन्शन राज्य महाअधिवेशनात बोलत होते.  या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर नेते  उपस्थ...

September 15, 2024 6:29 PM

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणार

कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणार आहे. या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठासमोर या प्रकरणाचा ताजा अहवाल सादर होणार आहे.  दरम्...

September 15, 2024 6:21 PM

सोलापूरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी करत सोलापूर शहरात बेमुदत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी माजी मंत्री प्रकाश शेंडगे हे देखील त्यांच्यासोबत होते. सरकार नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी असून या प्रश्ना...