September 16, 2024 3:12 PM

रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक भंडारा पोलिसांनी पकडला असून ८ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा ट्रक नांदेडवरून गोंदियाच्या दिशेने जात असल्याची माहिती भंडारा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या ...

September 16, 2024 2:54 PM

मविआ राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होणार – नाना पटोले

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. शिर्डी इथं आयोजित  निवृत्तीवेतन राज्य महा अधिवेशनात ते बोलत होते. जुनं निवृत्तीवेतन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, असं...

September 16, 2024 2:45 PM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातल्या गणपती विसर्जनाबाबत खोटी बातमी पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत, प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष ॲड. रविप...

September 16, 2024 3:24 PM

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज – प्रधानमंत्री

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारनं २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच...

September 16, 2024 2:09 PM

फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव उलटल्याने आठ जणांचा मृत्यू

फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव काल रात्री   उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. या रबरी नावेत ६० प्रवासी होते. त्यात आयरिट्रिया, सुदान, सीरिया आणि इराणच्या नागरिकांचा समावेश आहे. फ्रेंच आणि ब्रिटिश सरकार मदत आणि बचावकार्य करीत आहे. साधारण पंधरवड्यापूर्वी इंग्लिश खाडीत अशाच एका ...

September 16, 2024 3:25 PM

चित्रपटगृहात दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकही चित्रपटांचा आनंद लुटणार

दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद लुटता यावा याकरता चित्रपटगृहात विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून ई सिनेप्रमाणन या यंत्रणेमधून प्रदर्शनाचं प्रम...

September 16, 2024 1:51 PM

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इथल्या गोल्फ कोर्सवर एका संशयित बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे.   ट्रम्प यांनी,...

September 16, 2024 1:57 PM

देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात

  देशभरात उद्यापासून 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहाणार आहे. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे.   या अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान आणि सामूहिक कार्याच्या माध्यमातून पर्यटन ...

September 16, 2024 1:42 PM

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीत होणार

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. चार दिवसांच्या या कार्यक्रमात ४० देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होतील. या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालनं आणि जलक्षेत्रातले स्टार्टअप्स आपल्या संकल्पना मांडती...

September 16, 2024 1:39 PM

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी १६ सप्टेंबरला हा दिन साजरा केला जातो. सूर्याच्या घातक किरणांपासून पृथ्वीवरील वातावरणाचं संरक्षण करण्याचं कार्य हे ओझोनचं आवरण करत असतं.   सर्वसाधारण जीवनातल्या अनेक रसायनांच्या वापराने ओझोनचं आवरण पातळ होत असल्याचं आढळून आलं आहे. त्याच्या संवर...