September 26, 2024 2:18 PM

एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्‍यांनी घेतली उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींची भेट

एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल समरकंदमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्जियोयेव यांची भेट घेतली. डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, अणुऊर्जेचा नागरी उपयोग, आरोग्यसेवा आणि फार्मा क्...

September 26, 2024 3:20 PM

पूजा खेडकर यांना दिलासा कायम, सुनावणी पुढे ढकलली

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएसएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. खेडकरांच्‍या वकिलांनी तपशीलवार म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितला आहे.  आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार असून, ...

September 26, 2024 2:05 PM

युक्रेनला अण्वस्त्र पुरवणारा देश युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

रशिया विरुद्धच्या युद्धात यूक्रेनला अण्वस्त्र पुरवल्यास संबंधित देशही त्या युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. मॉस्को इथं काल झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. यूक्रेनने या युद्धात लांब पल्ल्याच्या पाश्चात्त्य क्षेपणास्त...

September 26, 2024 11:56 AM

“स्वछता ही सेवा” पंधरवड्या निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात राबवण्यात येत आहेत विविध उपक्रम

“स्वछता ही सेवा” पंधरवड्या निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत काल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ३२ स्पर्धकांनी यात सहभाग घेत, स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त हिंगोली शहर, स्वच्छ सुंदर आणि हरित हिंगोली, ईत्यादी विषयांवर रांगोळ्या काढल्या.  

September 26, 2024 11:41 AM

देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन

देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख मेट्रिक टनांनी वाढून ३३२२ लाख मेट्रिक टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२३-२४ साठी विविध महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाचे अंतिम अंदाज ...

September 26, 2024 2:07 PM

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ५७ टक्के मतदान झालं. सहा जिल्ह्यातल्या २६ मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं. श्री माता वैष्णो देवी मतदारसंघात सर्वाधिक ८० पूर्णांक ७४ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली, तर सुर्णकोट मध्ये ७४ पूर्णांक ९५ शतांश आणि पूँछ हवेली मध्ये ७४ पूर्णांक ६६ शत...

September 26, 2024 11:34 AM

देशाच्या एकंदर आरोग्य खर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट

भारताच्या एकंदर आरोग्य खर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाली आहे. २०१३-१४ मध्ये हे प्रमाण ६४ पूर्णांक दोन शतांश टक्के होतं, ते २०२१ मध्ये ३९ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठीचा ...

September 26, 2024 2:09 PM

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं.

September 26, 2024 1:13 PM

जागतिक सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत भारताच्या कमल चावलाला अजिंक्यपद

आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावला यानं अजिंक्यपद मिळवलं आहे. मंगोलियात उलानबातर इथं झालेल्या या स्पर्धेत कमल चावलानं पाकिस्तानच्या अस्जद इक्बालचा 6-2 असा पराभव केला. भारताचे मालकितसिंग, विद्या पिल्लई...

September 26, 2024 9:50 AM

आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, मराठा समाजा...