September 17, 2024 11:00 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी देशवासियांना ई-लिलावात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी नमामि गंगे योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. यावर्षी लिलावाचा सहावा हप्ता असून सुरु...

September 17, 2024 10:58 AM

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू होत आहे. नौदल कमांडर्समधील महत्त्वाच्या सामरिक, आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणारी ही परिषद म्हणजे सर्वोच्च पातळीवरील द्विवार्षिक कार्यक्रम आहे. चार दिवसीय परिषदेचा प्रारंभ नौदलप्रमुखांच्या बीजभाषणानं होणार आहे. या पर...

September 17, 2024 10:53 AM

आठव्या भारत जल सप्ताह 2024ला नवी दिल्लीत प्रारंभ

आठव्या भारतीय जल सप्ताहाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 400 देशांतील दोनशे परदेशी प्रतिनिधींसह सुमारे चार हजार इतर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनादरम्यान शंभराहू...

September 17, 2024 10:50 AM

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि चीन यांच्यात लढत

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. भारतीय संघानं काल दक्षिण कोरियावर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतीय हॉकी संघ आतापर्यंत स्पर्धेत अपरा...

September 17, 2024 10:20 AM

आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती

आमदार संजय शिरसाट यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडको च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्...

September 17, 2024 10:11 AM

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं केलं आहे. ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी दोन सत्रात होणार आहे. सर्व शाळांमधल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षण सेवक, शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्ती...

September 17, 2024 10:10 AM

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारची संमती

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारनं संमती दर्शवली आहे. आयोगाच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष भरतीच्या विविध स्तरांवरदेखील उमेदवाराची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार क्रमांक वापरला जाणार असल्याचं यासंदर्भ...

September 17, 2024 10:08 AM

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. या कामगिरीसाठी उद्या जागतिक बांबू दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. मुंब...

September 17, 2024 10:05 AM

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यातल्या 6 लाख 25 हजार 139 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यातल्या 6 लाख 25 हजार 139 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारं अपंगत्व...

September 17, 2024 10:01 AM

पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे, नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण

राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गांवर या गाड्या धावतील. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दा...