September 17, 2024 6:35 PM

मोदी सरकारच्या सऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या १०० दिवसात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत सुमारे ३ हजार ४८ कोटी रुपयांचं कर्ज वितरित

केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या १०० दिवसात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत सुमारे ३ हजार ४८ कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांजी यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही...

September 17, 2024 8:15 PM

कोलकात्याचे नवे पोलिस आयुक्त म्हणून मनोज कुमार वर्मा यांची नियुक्ती

कोलकात्याचे नवे पोलिस आयुक्त म्हणून मनोज कुमार वर्मा यांची नियुक्ती झाली आहे. सध्याचे आय़ुक्त विनीतकुमार गोयल यांची बदली पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृतीदलाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी केली आहे. तर, कोलकात्याचे उपायुक्तत अभिषेक गुप्ता यांची बदली ईस्टन फ्रंटियर रायफल्सच्या कमांडट पदी झाली आहे....

September 17, 2024 6:12 PM

दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, त्यांचं आरक्षण आहे तसचं राहील, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यात डहाणू इथं दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र ...

September 17, 2024 5:55 PM

नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव

नेत्रदान हे महान कार्य असून यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपण इतरांच्या माध्यमातून जगू शकतो, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे जे रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन इथं २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदान संकल्प अभियानाचं आयोजन कर...

September 17, 2024 5:47 PM

वाशिम जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात

देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला सुरुवात झाली आहे. वाशिममध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय आणि परिसर स्वच्छ केला. वाशिम तालुक्यातल्या आडोळी, मालेगाव तालुक्यातल्या ढोरखेड...

September 17, 2024 5:32 PM

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये NPPचे नेते अनुरा कुमार दिसनायके यांनी आघाडी मिळवली असली, तरी दिसनायके आणि SLPPचे नेते नमल राजपक्षे यांच्यात ५० टक्के मते मिळवण्याची चढाओढ कायम असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्...

September 17, 2024 4:41 PM

इतर भाषांचा आदर बाळगून हिंदीला प्रोत्साहन देणं गरजेचं – प्रसारभारती अध्यक्ष नवनीत कुमार सहगल

इतर भाषांचा आदर बाळगून हिंदीला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे. हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी तसंच आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालिवाल यावेळी उपस्थित होत्या.  आकाशवाणी...

September 17, 2024 4:38 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी त्यांच्या कार्यातून देशाची समृद्धी आणि प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा,...

September 17, 2024 4:34 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आठव्या भारत जल सप्ताहची सुरुवात

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाली. आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली तसंच अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं, असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. भारतीय धर्मग्रंथात हजारो वर्...

September 17, 2024 4:26 PM

 गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात १ पूर्णांक ३१ शतांश टक्के घट

 गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात एक पूर्णांक ३१ शतांश टक्के घट झाली आहे. इंधनाच्या दरात घट झाल्यामुळे तसंच अन्नपदार्थांची दरवाढ मंदावल्यामुळे ही घट झाल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. गेल्या जुलैमधे हा दर पावणेचार टक्के होता तो ऑगस्टमधे तीन पूर्णांक ११ शतांश टक...