September 17, 2024 7:53 PM

ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिटच्या दुसऱ्या आवृत्तीचं बोधचिन्ह आणि माहिती पत्रकाचं आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

जागतिक लोकसंख्येचं आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अन्नसुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे, असं प्रतिपादन आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिटच्या दुसऱ्या आवृत्तीचं बोधचिन्ह आणि माहिती पत्रकाचं अनावरण करताना ते बोलेत होते. भारतीय अन्नसुरक्षा आणि म...

September 17, 2024 7:39 PM

‘विश्वशांतीदूत वसुधैव कुटुंबकम’ गीताचं दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे विश्वशांती दूत वसुधैव कुटुंबकम् या गाण्याचं आज मुंबईत लोकार्पण करण्यात आलं. पंडीत हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी हे गीत गायलं आहे.  यानिमित्त हिंगोली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांगांना साहि...

September 17, 2024 7:03 PM

धुळ्यात विसर्जन मिरवणुकीत तिघांचा मृत्यू, ६ जण जखमी

धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली चिडल्यानं तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांना भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धुळ्यातल्या चितोड गावात ट्रॅक्टरवरून विसर्जन मिरवणूक सुरू असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

September 17, 2024 6:59 PM

राज्यात सर्वत्र गणेशविसर्जनाचा उत्साह

भाद्रपद महिन्यात गणेशचतुर्थी पासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. त्यामुळं लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण देत वाजत गाजत निरोप देण्याची चढाओढ राज्यात सर्वत्र दिसून येते आहे. मुंबईत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासून विसर्जन मिरवणुका काढण्यात येत आहेत. ढोल ताशा...

September 17, 2024 6:57 PM

राज्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढत लाडक्या गणरायाला भक्तांचा निरोप

पुणे शहरातल्या कसबा पेठ आणि तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दोन गणपतींचं विसर्जन झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज ३७ हजार ८०५ खासगी, तर ६६ सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होत आहे. धुळे जिल्ह्यात ४१६ मंडळांकडून गणेश विसर्जन करण्यात येत आहे. यात ३९२ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचा समावेश आहे. १३ खासगी तर ...

September 17, 2024 7:08 PM

सर्व क्षेत्रात मराठवाड्याची प्रगती करणं हेच शासनाचं ध्येय आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्यातल्या बेरोजगारी, पाणीटंचाई, यासारख्या समस्या सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून, कृषी, दळणवळण, उद्योग, पायाभुत सुविधा अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची प्रगती करणं हेच शासनाचं ध्येय आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथ...

September 17, 2024 7:13 PM

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग पाचव्यांदा अजिंक्यपद

चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत, आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं चीनवर १-० असा विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. भारताचं हे विक्रमी पाचवं आशियाई विजेतेपद ठरलं आहे. सामन्याची पहिली तीनही सत्र गोलशून्य बरोबरीत राहिली. त्यानंतर चौथ्या सत्रात भारताचा जुगराज सिंग यानं ५१व्या मिनिट...

September 17, 2024 6:50 PM

गेल्या १०० दिवसात सरकारकडून ९ पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर

गेल्या १०० दिवसात सरकारनं ९ पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर केले. त्यामुळे ११ कोटी मनुष्यदिवस इतकी रोजगारनिर्मिती होणार असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं. केंद्रीकृत निवृत्तीवेतन, व्यवस्थेअतंर्गत येत्या १ जानेवारीपासून निवृत्त कर्माचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या बँकेतून निवृत्ती...

September 17, 2024 6:41 PM

गेल्या ९ वर्षात देशातल्या दूधउत्पादनात ५७ टक्क्यापेक्षा जास्त वाढ

गेल्या ९ वर्षात देशातल्या दूधउत्पादनात ५७ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली असल्याचं, केंद्रीय मत्सोउद्योग, पशुपालन आणि दुग्धउत्पादन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी सांगितलं. मत्सउत्पादनातही चांगली वाढ झाली असून त्याबाबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, असं ते म्हणाले. २०१३-१४ मधे देशातलं मत्सउत्पादन ९५ लाख टनापे...

September 17, 2024 6:34 PM

राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  गायकवाड यांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त करत कॉंग्रेसनं बुलडाणा शहरात आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्य...