June 17, 2024 9:45 AM

पाणी प्रश्नी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचं मंथन परिषदेतून आवाहन

छत्रपती संभाजीनगर इथं काल मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मासिआ, शेतकरी सहकारी पाणी वापर संस्था आणि साखर कारखान्यार्फे मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर मंथन परिषद पार पडली. खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, आमदार राजेश ट...

June 17, 2024 7:42 PM

बकरी ईद सण देशभरात उत्साहात साजरा

ईद उल अजहा हा सण देशभरात उत्साहाने साजरा होत आहे.  देशाच्या विविध भागात आज ईदगाह तसंच मशिदीत नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.   नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या प्रार्थना भवनात जामिया अरेबीय इस्लामीया या संस्थेनं बकरी ईद निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बकरी ईदचा नमाज अदा करुन...

June 17, 2024 1:43 PM

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादाची घुसखोरी-मुख्यमंत्र्यांचा आरोप

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादानं घुसखोरी केल्याचा आरोप मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी विजय संकल्प मेळावा काल झाला, त्यात मुख्यमंत्री बोलत होते. याच संस्थांच्या सहाय्याने महाविकास आघाडीने लोकसभा निवडण...

June 16, 2024 8:45 PM

बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात उष्णतेची तीव्र लाट

बिहार, झारखंड, ईशान्य मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात पुढील दोन दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांश भागातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि उत्तर...

June 16, 2024 8:37 PM

चीनमधल्या ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर

जोरदार पावसामुळे चीनमधल्या ग्वांगशी झुआंग या स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर आला आहे. पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याचं ग्वांगशी झुआंगमधल्या ३० जलविज्ञान केंद्रांनी म्हटलं आहे. तर फुजिआन प्रांतात दरड कोसळल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. चीनमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर येण्याच...

June 16, 2024 8:47 PM

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा – मुख्यमंत्री शिंदे

पूर्ण ताकतीनं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे, निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षाच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगानं आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यांनी आज मुंबईत घेतली. त्यावेळी ते ब...

June 16, 2024 9:02 PM

१८व्या ‘मिफ’ महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात पार

  १८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांसह पार पडला. माहितीपट क्षेत्रातल्या नवोदितांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 'माहितीपट बझार'चं उद्घाटन 'दिल्ली क्राइम' या गाजलेल्या वेबसीरिजच्या निर्मात्...

June 17, 2024 2:25 PM

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. आगामी अमरनाथ यात्रेच्...

June 16, 2024 8:01 PM

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या तीन दिवसात अकरा जणांकडून एकूण दहा किलोहून अधिक सोने जप्त केलं. या सोन्याची एकूण किंमत ६ कोटी ७१ लाख एवढी आहे. मेणाच्या वस्तू, दागिन्यांचे साचे तसंच अंगावरुन अशा विविध मार्गाने या सोन्याची तस्करी होत होती.   १४ ते १६ जून या कालावधीत शारजा ते मुंबई, मुंब...

June 16, 2024 8:48 PM

योग्य जागा दिल्या नाहीत तर ३० जागांवर निवडणूक लढणार – पीपल्स रिपब्लिकन पक्ष

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं योग्य जागा दिल्या नाहीत तर आपण राज्यात ३० जागांवर निवडणूक लढणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते ठाण्यात बातमीदाराशी बोलत होते. राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि एका महामंडळात पक्षाला प्रतिनिधित्व द्यावं, ...