June 17, 2024 6:22 PM

पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडीमध्ये रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या न्यु जलपायगुडी स्थानकाजवळ सियालदाहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ठिकाणीचे बचाव कार्य पूर्ण झालं आहे. प्रथमदर्शनी मालगा...

June 17, 2024 2:43 PM

सिक्कीममध्ये अद्यापही अडकलेल्या सुमारे २ हजार पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

सिक्कीमच्या पुरग्रस्त भागात अडकलेल्या सुमारे दोन हजार पर्यटकांना सुरक्षीतपणं बाहेर काढायला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या सर्व प्रवाशांना रस्तेमार्गे बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती मगन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेमुकमार छेत्री यांनी सांगितलं.

June 17, 2024 11:15 AM

संसदेच्या आवारातील प्रेरणा स्थळाचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

संसदेच्या आवारात नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रेरणा स्थळाचं उद्घाटन काल राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं. संसदेला भेट देण्यासाठी आलेल्या अभ्यागतांना स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे आणि नेते यांचे पुतळे एकाच ठिकाणी पाहता यावेत अशा पद्धतीने या प्रेरणा स्थळाची रचना करण्यात आली ...

June 17, 2024 11:13 AM

भारत आणि कंबोडिया थेट विमानसेवा सुरू

  भारत आणि कंबोडिया यांच्यात कालपासून थेट विमानसेवा सुरू झाली. कंबोडियाचे उपपंतप्रधान नेथ सेवोउन आणि तिथल्या भारतीय राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्या हस्ते काल या विमानसेवेचं अधिकृत उद्घाटन झालं. या विमानसेवेद्वारे पहिल्या पर्यटन वर्षाची सुरुवात झाली असून यामुळे पर्यटनाला तसंच नागरिकांचा परस्पर संवाद...

June 17, 2024 11:04 AM

रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारताचा भर

रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारतानं भर दिला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या युक्रेन शांतता परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे सचिव पवन कपूर सहभागी झाले होते. या परिषदेत त्यांनी भारताचा दृष्टीकोन स्प...

June 17, 2024 11:01 AM

आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाची जनजागृती मोहीम

देशातल्या आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अर्थात सीबीआयसीनं विविध माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत अशा फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी वर्तमानपत्रं, मोबाईल संदेश, इ-मेल्स आणि समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना सूचना देण्यात य...

June 17, 2024 10:48 AM

लवकरच स्वतःचं समुद्रतळ अभियान असलेला जगातला सहावा देश होण्यास भारत सज्ज – मंत्री डॉ. जितेंद्र सिंग

लवकरच स्वतःचं समुद्रतळ अभियान असलेला जगातला सहावा देश होण्यास भारत सज्ज आहे अशी माहिती भूविज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत सिंग यांनी समु...

June 17, 2024 1:40 PM

२२ जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नाहीसा झालेला मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून प्रामुख्यानं घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या ८ दिवसात चांगल्या पद्धतीनं बरसलेला मोसमी पाऊस गेल्या आठवड...

June 17, 2024 10:23 AM

पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या निर्णयात चुका असल्याचा चौकशी समितीचा अहवाल

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना, बाल न्याय मंडळानं अनेक चुका केल्या असल्याचा ठपका पाच सदस्यांच्या समितीनं ठेवला आहे. मंडळाच्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या समितीनं तयार केलेल्या १०० पानी अहवालात बाल न्याय मंडळाद्वारे अनेक चुका झाल्या...

June 17, 2024 10:21 AM

नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार

नागरिकांना जलद, वेळेवर आणि त्रुटिमुक्त न्याय देण्यासाठी देशात येत्या १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. देशातील परिस्थिति आणि बदलणाऱ्या कालानुरूप, कायद्यांमध्ये ही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी काल कोलकाता इथं व्यक्त क...