June 18, 2024 2:47 PM

सिक्कीम मध्ये पूर स्थितीमुळं अडकलेल्या ५०० पर्यटकांची सुखरूप सुटका

सिक्कीम मधल्या चुंगथांग भागांत पूर स्थितीमुळं अडकलेल्या ५०० पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात सीमा रस्ते संघटन आणि मंगन जिल्हा प्रशासनाला आज यश आलं.अतिवृष्टी, खराब हवामान आणि भूस्खलनामुळं अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या परिस्थितीत सुद्धा सीमा रस्ते संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरूच ठेवलं. इतर अडकल...

June 18, 2024 11:49 AM

राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागातल्या रिक्त पदांसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया

राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागात रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे साडे सातशे, परभणीत १४१ तर जालना पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या १०२ आणि चालक पदाच्या २३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होईल. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी ...

June 18, 2024 9:11 AM

दार्जिलिंगमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सायंकाळी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये रेल्वेमंत्र्यांनी मदत जाहीर केली. या अपघाताच्या प...

June 18, 2024 11:23 AM

बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा

बकरी ईदचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात काल म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रक...

June 17, 2024 8:29 PM

उत्तर काश्मिर : सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

उत्तर काश्मिरच्या बांदीपूर जिल्ह्यातल्या अरगामा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सु...

June 17, 2024 8:27 PM

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. जागतिक हितासाठी भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.   दरम्यान...

June 17, 2024 8:21 PM

भारताच्या काही भागात पुढील २ दिवस उष्णतेची लाट

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तर मध्यप्रदेश आणि आंध्र ...

June 18, 2024 1:04 PM

‘मिफ’ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन

१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस अनेक चित्रपट, माहितीपट, लघुपटांच्या प्रदर्शनांनी उत्साहात पार पडला. मिफमध्ये आज प्रतिष्ठेच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेल्या काही वर्षांत निवडल्या गेलेल्या काही निवडक चित्रपटांसोबत रशिया, इराण, इटली इत्यादी दे...

June 17, 2024 8:34 PM

वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली. ...

June 17, 2024 7:32 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार क...