June 18, 2024 8:15 PM

पंढरपूर- कराड मार्गावर भरधाव ट्रकनं उडवल्यानं ६ मजूर महिलांचा मृत्यू,

सोलापूर जिल्ह्यात, पंढरपूर- कराड मार्गावर चिकमहुद जवळ आज भरधाव ट्रकनं मजूर महिलांना उडवलं, त्यात सहा महिला जागीच ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिला रस्त्याच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. ग्र...

June 18, 2024 8:13 PM

यंदा प्रत्यक्ष कर संकलनात भरीव वाढ

चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलनात २२ पूर्णांक १९ शतांश टक्के, तर निव्वळ कर संकलनात सुमारे २१ टक्क्याची घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत सुमारे ५ लाख १५ हजार कोटी रुपयांहून अधिक एकूण प्रत्यक्ष कर तर सुमारे ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांहून अधिक निव्वळ कर गोळा ...

June 18, 2024 8:05 PM

मिफमधे आज भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शनसत्र

१८वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा आजचा चौथ्या दिवसही विविध चित्रपटांचं प्रदर्शन, संबंधित विषयांवरची चर्चासत्रं आणि मार्गदर्शनसत्रं, तसंच परिसंवादांनी गाजला. भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर अल्फोन्स रॉय यांचं मार्गदर्शनसत्र  आज झालं. ॲनिमेशनपटांचा प्रवास ...

June 18, 2024 8:01 PM

जातनिहाय जनगणना करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

महायुती सरकारनं आरक्षणाबाबत दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली असून पुरोगामी महाराष्ट्राचं गतवैभव परत मिळवण्यासाठी आणि दोन्ही समाजांचं समाधान करण्यासाठी सरकारनं जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अशी मागणी करणारं एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे,...

June 18, 2024 7:51 PM

सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून अहमदनगरमधून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून अहमदनगरमधून सुरुवात झाली. लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर या दौऱ्याची व्यापकता वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली  करायचा आहे. यापुढं सर्वांनी जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं, असं आवाहन त्यांनी अहमदनगरमधल्या आढा...

June 18, 2024 7:47 PM

उज्वल निकम यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून राज्य सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची नाना पटोले यांची टीका

उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून राज्य सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.  भाजपाचं सरकार विद्यार्थी आणि तरुणांची...

June 18, 2024 7:40 PM

वसईमध्ये भर रस्त्यात तरुणीचा हत्या

वसईमध्ये आज भर रस्त्यात एका तरुणानं एका मुलीवर वार करत तिची हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना दिले असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. सखोल तपास करुन, न्यायालयात भ...

June 18, 2024 7:34 PM

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच ७७ हजारांच्या वर आणि निफ्टीही पहिल्यांदाच २३ हजार ५०० अंकांच्यावर स्थिरावला. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सेन्सेक्स ७७ हजारांच्या आणि निफ्टी २३ हजार ५०० च्या वर व्यवहार करत होते. दिवसभर बाजारात हे सातत्य कायम राहिलं आणि ...

June 18, 2024 7:30 PM

लातूर जिल्ह्यात 200 हेक्टरवर होणार ‘मिलेट’ची पेरणी

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते भरड धान्य पेरणी करून जिल्ह्यात २०० हेक्टर क्षेत्रावर भरड धान्य पेरणी करण्याचा प्रारंभ झाला. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारानं जिल्ह्यात भरड धान्य उत्पादन वाढवण्याच्या उद्देशानं ...

June 18, 2024 7:27 PM

देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध – मंत्री रक्षा खडसे

शेतकरी हा देशाचा कणा आहे, देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असेल, असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज हिंगोली इथं केलं. हिंगोली जिल्ह्यात  तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमं...