September 18, 2024 9:41 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री २१ सप्टेंबर रोजी डेलावेअरमधल्या विलमिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या क्वाड नेत्यांच्या शिखर संमेलनात सहभागी होतील. क्वाड शिखर परिषदेचं यजमानपद भूषविण्याची विनंती अमेरिकेनं भारताला विनंती...

September 18, 2024 8:55 AM

सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नेत्रदान ही लोक चळवळ बनवण्यासाठी सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल मुंबईत केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून राजभवनात 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालां...

September 18, 2024 8:37 AM

अतिवृष्टीमुळे नुकसानपोटी परभणी जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळेल – पालकमंत्री संजय बनसोडे

अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल...

September 18, 2024 9:02 AM

आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. त्यांची काल दिल्ली विधानसभेत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला.

September 17, 2024 8:19 PM

प्रयेत्या २१ ते २३ तारखेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार अमेरिकेचा दौरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्य...

September 17, 2024 8:17 PM

क्रीडा क्षेत्रात उत्तेजक वापराविरोधातल्या प्रयत्नांत भारत आघाडीवर राहून काम करण्यासाठी वचनबद्ध – केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय

क्रीडा क्षेत्रात उत्तेजक वापराविरोधातल्या प्रयत्नांत भारत आघाडीवर राहून काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज युनेस्कोच्या क्रिडा क्षेत्रातल्या उत्तेजक वापराविरोधातल्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत कॉप नाईन विभागाच...

September 17, 2024 8:10 PM

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला. पोलंडमधे पुराच्या पाण्यात ४ जण वाहून गेले. या वादळाचा फटका बसून गेला महिनाभर दक्षिण पोलंडमधे जनजीवन प्रभावित झालं आहे.  सुमारे ५ हजार सैनिक बचावकार्यात गुंतले आहेत. रुमानियात ७ जण मृत्यूमुखी पडले असून येत्या १६ ऑक्टोबरपर्यं...

September 17, 2024 8:05 PM

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या २४ मतदारसंघांमध्ये मतदान

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे. ९० अपक्षांसह एकूण २१९ उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. सात जिल्ह्यांमधल्या मिळून २४ विधानसभा मतदारसंघांमधे मतदान होणार असून त्यात जम्मूतले ४ तर काश्मीर खोऱ्यातले १६ मतदारसंघ आहेत. ऑगस्ट २०१९ मधे कलम ३७० रद्द झाल्यानंत...

September 17, 2024 7:57 PM

भारत हा पॅरिस कराराअंतर्गत निर्देशांकातले टप्पे वेळेआधीच गाठणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

भारत हा पॅरिस कराराअंतर्गत निर्देशांकातले टप्पे वेळेआधीच गाठणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ते आज सीआयआय - आयटीसीच्या शाश्वतता विषयक १९व्या शिखर परिषदेत बोलत होते. शाश्वत पर्यावरणासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत ...

September 17, 2024 8:23 PM

अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील असं आम आदमी पार्टीने जाहीर केलं आहे. आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्याआधी अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.  पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आतिशी...