September 18, 2024 12:53 PM

उत्तरप्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तरप्रदेशात सततचा मुसळधार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आलेल्या पुराचा फटका चोवीस जिल्ह्यातल्या पाच लाख लोकांना बसला आहे. राज्यातल्या जवळपास सर्व नद्यांना पूर आला असून गंगा आणि घागरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे. वाराणसी आणि ...

September 18, 2024 1:41 PM

साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दराने न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन

साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन देशात आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दराने विकू नये असं केंद्रसरकारने खाद्यतेल विक्रेता संघटनांना सांगितलं आहे.  हा साठा पूर्णपणे संपत नाही.  तो पर्यंत किरकोळ  खाद्यतेलाचे भाव वाढवू नयेत असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. खाद्यतेलाच्या दरनिश्चितीबाबत अन्न आणि सार्व...

September 18, 2024 12:43 PM

भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण कालं नवी दिल्ली इथं केलं. यावेळी रोमानियाच्या भारतातल्या राजदूत डॅनिएला मरियाना सेजोनोव उपस्थित होत्या.  हे टपाल तिकीट भारत आणि रोमानिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतिक आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. द...

September 18, 2024 12:26 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर जात आहेत. जयपूरमधल्या मालविय नॅशनल इन्स्टिट्यू ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातल्या पदवीदान समारंभात त्या आज प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या वसतीगृहाचंही त्या उद्घाटन करणार आहेत. या कार्यक...

September 18, 2024 12:28 PM

जागतिक कृषी मंचाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही २० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे.

September 18, 2024 10:17 AM

२०३०पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी गांधीनगर मध्ये झालेल्या पुनर्गुंतवणूक बैठकीच्या चौथ्या टप्प्यात २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. जोशी पत्रकार परिषदेत बोलत होते. विविध राज्य सरकारे आणि खाजगी उत्पादकांसह सर...

September 18, 2024 11:02 AM

‘केंद्र सरकारने भारताचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली’

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेतला असून सरकारने पहिल्या १०० दिवसांत भारताचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारताने या वर्षी जुलैमध्ये दिल्ली इथं जागतिक वार...

September 19, 2024 10:08 AM

इस्रो पहिल्या मानवरहित गगनयान अभियान मोहिमेसाठी सज्ज

  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   ...

September 18, 2024 9:58 AM

नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ ऐतिहासिक असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचं प्रतिपादन

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ ऐतिहासिक असल्याचं म्हटलं असून पहिल्या १०० दिवसांमध्ये सरकारने लोकांच्या कल्याणासाठी १५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. आकाशवाणीशी विशेष संवाद साधताना रिजिजू म्हणाले की, सरकार ...

September 18, 2024 9:48 AM

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल – मंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. काल संध्याकाळी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, प्रध...