September 18, 2024 5:48 PM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग चार दिवसाच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु

  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग चार दिवसाच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु झाले. आज १५२ गाड्यांची आवक झाली असून दिवसभरात कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत भाव मिळाला. गेले काही दिवस कांद्याचा पुरवठा कमी झाल्यानं किरकोळ विक्रीचे दर ६० ते ७० रुपये किलो पर्यंत पो...

September 18, 2024 3:22 PM

गणेशविसर्जनाच्या वेळी ८ जणांचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहराजवळ चितोड गावात विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली आल्यानं काल तीन बालकांचा मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले. धुळे शहरात काल संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाल...

September 18, 2024 2:39 PM

भारतीय रेल्वे विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला सुरूवात

स्वच्छ भारत अभियानाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त, 'स्वच्छता ही सेवा २०२४' ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात देशभरात राबवली जात आहे. त्या अंतर्गत भारतीय रेल्वे विभागानेही आज नवी दिल्ली इथल्या रेल भवनमध्ये या मोहिमेची सुरुवात केली. रेल्वे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सतीश कु...

September 18, 2024 3:02 PM

राज्यात गणेशोत्सवाच्या पर्वाची गणेश विसर्जनाने सांगता

णेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. राज्यात सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं. मुंबईत मोठ्या ...

September 18, 2024 1:35 PM

देशातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हरियाणा, चंदिगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांमध्येही मुसळधार पाऊस होईल. आज संध्याकाळपर्यंत मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात त...

September 18, 2024 1:27 PM

‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सात हजार झाडं लावली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी सुरु केलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपर्यंत सुमारे सात हजार झाडं लावली आहेत. देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मिळून विविध कार्यालयात हे अभियान राबवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ऑगस्टच्या दुस...

September 18, 2024 1:17 PM

आंध्र प्रदेशातल्या पुरग्रस्त कुटुंबांना मदतीची घोषणा

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी काल मदतीची घोषणा केली. विजयवाडा इथल्या सर्व ३२ प्रभागांमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, तसंच पूरबाधित घरांची दुरुस्तीही केली जाईल, असं मुख्यमंत्री नायडू यावेळी म्हणाले.   ...

September 18, 2024 1:10 PM

जम्मू काश्मीरमधल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीरमधल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. विशेषतः तरुण मतदारांनी मतदान करावं, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केवळ मजबूत सरकारच दहशतमुक्त जम...

September 18, 2024 1:03 PM

उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं भारत आणि उरुग्वे यांच्यात चर्चेची सहावी फेरी

भारत आणि उरुग्वे यांच्यातली चर्चेची सहावी फेरी १६ सप्टेंबर रोजी उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं झाली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, रेल्वे, आयुर्वेद आणि योग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक जागतिक प्रश्नांवरही चर्चा झाली. या...

September 18, 2024 1:00 PM

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नवी दिल्लीत बैठक

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा आणि समुद्री क्षेत्र या विविध विषयांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक क्षेत्रातल्या दोन दोन प्रतिनिधींच्या या अंतरस्तरीय बैठकींच्या माध्यमातून चर्चा झाल्या अ...