June 26, 2024 8:09 PM

आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठी भारताचा हॉकी संघ जाहीर

आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठी १६ सदस्यांचा भारतीय हॉकी  संघ आज हॉकी इंडियानं नवी दिल्लीत जाहीर केला. या संघातले पाच हॉकीपटू पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणार असून तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळणारा अनुभवी हरमनप्रित सिंग कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करेल. तर हार्दिक सिंग उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. भारतीय संघा...

June 26, 2024 7:58 PM

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण: झारखंड मधल्या ओएसिस शाळेच्या मुख्याध्यापकाची सीबीआय चौकशी

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास  करणाऱ्या सीबीआय पथकानं आज झारखंड मधल्या हजारीबाग इथल्या ओएसीस शाळेत चौकशी सुरु केली. शाळेचे मुख्याध्यापक अहसनुल हक याना या पेपरफुटीबाबत पथकानं प्रश्न विचारले. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीत प्रमाण कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचं मुख्याध्यापकांनी सा...

June 26, 2024 7:54 PM

म्यानमार हिंसाचारामुळे भारताच्या सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भारताकडून चिंता व्यक्त

भारताच्या सीमेवर म्यानमारमधे सुरू असलेली हिंसा आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याबद्दल भारताला मोठी चिंता वाटत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत  जयशंकर तसंच म्यानमारचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यु थान श्वे यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बो...

June 26, 2024 7:35 PM

स्टेम क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मुंबईत ‘स्पार्क’ कार्यक्रमाचा प्रारंभ

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, अर्थात स्टेम क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री पश्चिम विभाग आणि इंडियन विमेन नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क या कार्यक्रमाचा प्रारंभ आज मुंबईत करण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात हा कार्यक्रम रा...

June 26, 2024 7:30 PM

स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक

एसटी महामंडळाने घेतलेल्या स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात 'अ' वर्गामध्ये जळगावं जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला असून बसस्थानकाला ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.  'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला पहिला क्रमांक आला असून बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस मि...

June 26, 2024 7:25 PM

सीबीएसईच्या इयत्ता १०वी आणि १२वी पुरवणी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

सीबीएसई अर्थात  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक आज जाहीर झालं. ही परीक्षा १५ ते २२ जुलै या कालावधीत होईल. सीबीएसईच्या संकेतस्थळावर  हे वेळापत्रक उपलब्ध आहे.  परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत होईल, परंतु भारतीय संगीत, चित्रकला,...

June 26, 2024 7:05 PM

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६४ टक्के मतदान

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी आज मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात ५२ पूर्णांक १८ शतांश टक्के, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ७३ पूर्णांक ३६ शतांश टक्के मतदान झालं होतं.  कोकण पदवीधर मतदारसंघात ५९ पूर्णांक ३१ शतांश टक्के, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ७० टक्के पेक्षा जास्त मतदान झा...

June 26, 2024 7:07 PM

वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण हक्क परिषदेत आरक्षणाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याची मागणी

छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमातून पक्षानं दिलेले ११ ठराव मांडण्याचे आणि त्या ठरावाचे बॅनर शहरातल्या मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षानं दिले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी आरक्षणाची प्र...

June 26, 2024 6:26 PM

‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प – मुख्यमंत्री

'दरड प्रवण क्षेत्र मुक्त' मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून त्याची सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. त्यांनी मुंबईत असल्फा इथल्या हनुमान टेकडी परिसरात भेट देऊन तिथं सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. दरड प्रवण क्षेत्राला सुरक्षा...

June 26, 2024 3:49 PM

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे एका रुग्णाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजाराने चालू महिन्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात १० लोक दगावले. काल आणखी ६ जणांना स्वाईन फ्ल्यू ची लागण झाल्याचं आढळून आलं असून यामुळे लागण झालेल्यांची संख्या ३५ इतकी झाली आहे.   पुणे जिल्ह्यात कोथरूड मधल्या एरंडवणे भागात  दोन जणा...