June 27, 2024 11:49 AM

येत्या २४ तासात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे

June 27, 2024 11:14 AM

पुणे जिल्हयात १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी- पुणे कृषी विभाग

पुणे जिल्हयाच्या पूर्व भागातील तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी अन्य तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळं किमान १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला पुणे कृषी विभागानं दिला आहे.मावळ तालुक्यात भात या मुख्य पिकाबरोबरच सोयाबीन,भूईमूग आणि इतर कडधान्यांची लागवड केली जाते....

June 27, 2024 10:21 AM

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील ४ पैकी २ संशयित आरोपी अद्याप फरार

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपी शिक्षकांकडे ज्या १२ विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली आहेत, त्यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांची लातूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल...

June 27, 2024 9:43 AM

सातारा जिल्ह्यातील नद्यांजवळील शेतकऱ्यांनी सिंचन पंप सुरक्षित स्थळी हलवण्याचे कोयना सिंचन विभागाचे आदेश

सातारा जिल्ह्यातल्या कोयना, तारळी, उत्तरमांड, वांग, उत्तरवांग नआद्या तसंच या नद्यांवरचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि महिर, चाफळ आणि चाळकेवाडी तलाव इत्यादी ठिकाणी पुरामुळं शेतकऱ्यांच्या सिंचन पंपांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणचे उपसा सिंचन योजना पंप शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपा...

June 27, 2024 9:29 AM

गडचिरोलीत कवसेर प्रकल्पामुळे कुपोषित श्रेणीतल्या १७७ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कवसेर प्रकल्पामुळे गेल्या महिन्याभरात तीव्र कुपोषित श्रेणीतल्या १७७ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ६१५ तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र आणि बाल उपचार केंद्रांमध्ये दाखल करुन त्यांना सकस आहार पुरवण्यात आला. ३० दिवस...

June 27, 2024 9:17 AM

जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला सुंदर बसस्थानक अभियानाचा पुरस्कार जाहीर

राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात अ वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकानं प्रथम क्रमांक मिळवला आहे.   चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, या अभियानाअंतर्गत 'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्य...

June 27, 2024 8:58 AM

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ

१८ व्या लोकसभेचे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानानं निवड करण्यात आली. सभापती म्हणून संसदीय मूल्यं आणि लोकशाही परंपरांचं पालन करण्याला आपलं प्राधान्य असेल असं बिर्ला यांनी आपल्या आभाराच्या भाषणात सांगितलं. लोकसभेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा चर्चेचा मार्ग अ...

June 27, 2024 8:49 AM

नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९३.४८ टक्के मतदान

विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. संध्याकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार मुंबई पदवीधर मतदारसंघात सरासरी ५६ टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात ७५ टक्के आणि कोकण पदवीधर मतदारसंघात ६३ टक्के मतदान झालं. नाशिक शिक्षक मतदारसंघात ९३.४८...

June 26, 2024 8:19 PM

युक्रेनला अमेरिकेचं आर्थिक पाठबळ राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नसल्याची रशियाच्या राजदूताची स्पष्टोक्ती

अमेरिका जोपर्यंत युक्रेनला युद्धासाठी आर्थिक पाठबळ देत राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नाही, असं आज रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विशेष राजदूत रॉडिऑन मिरोशनिक यांनी सांगितलं. ते मुंबईत रशियन हाऊस इथं तज्ञांशी आणि प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युक्रेनला मदत करणं अमेरिकेन...

June 26, 2024 8:17 PM

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.  राज्यातल्या सर्व मुद्द्यावर सरकार विरोधकांशी चर्चा करायला तयार आहे. पण विरोधकांना केवळ जनतेची...