June 28, 2024 6:33 PM

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या कर हिश्श्यात वाढ होण्याची अपेक्षा असून अर्थसंकल्पात पर्यायांचा विचार केल्याचं अ...

June 28, 2024 5:53 PM

महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा

बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातल्या अडीच कोटींहून अधिक महिलांना याचा ला...

June 28, 2024 5:14 PM

वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा

वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. यातून किर्तनकार, वारकरी, भजनीमंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसंच पालखी मार्गांचं व्यवस्थापन केलं जाईल, असं ते म्हणाले. पंढरपूर वारीला जागतिक नामांकनासाठी म...

June 28, 2024 5:48 PM

शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’ची घोषणा

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या साडे ७ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या  शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाईल. याशिवाय मागेल त्याला सौरउर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केली. साडे 8 ल...

June 28, 2024 4:58 PM

दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ जाहीर

सर्व स्वरुपातलं सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसं करण्याचं शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा मानस राज्य सरकारनं जाहीर केला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून आता दरमहा एक हजार ऐवजी दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल. दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघ...

June 28, 2024 5:50 PM

युवकांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा

युवकांना प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण मिळावं यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा या अर्थसंकल्पात झाली. याअंतर्गत दहा लाख युवकांना वर्षभर कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन राज्य सरकार देईल. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यास...

June 29, 2024 3:33 PM

भारतीय खेळाडूंचा अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारताच्या मालविका बनसोडचा महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश टेक्सास इथं सुरू असलेल्या अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या मालविका बनसोडनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत मालविकानं स्कॉटलँडची बॅडमिंटनपटू क्रिस्टी गिल्मोरचा १०-२१, २१-१५, २१-१० असा पराभव केल...

June 28, 2024 3:04 PM

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करुन भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर भारतीय संघानं पहिले दोन गडी झटपट गमावले, त्यानंतर प...

June 28, 2024 2:50 PM

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी सुरुवातीला तेजीचं वातावरण दिसून आलं. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली.   मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३०८ अंकांची वाढ नोंदवत ७९ हजार ५५१ अंकांची नवी उंची गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८७ अंकांची वाढ नोंदवत २४...

June 28, 2024 2:46 PM

सार्क देशांमधल्या चलन अदलाबदल सुविधेसाठी नवीन सुधारित चौकट लागू – भारतीय रिझर्व्ह बँक

सार्क देशांमधल्या चलन अदलाबदल सुविधेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं नवीन सुधारित चौकट लागू केली आहे. या सुधारणेनुसार, २०२४ ते २०२७ या काळात ज्या सार्क देशांच्या मध्यवर्ती बँका चलन अदलाबदल सुविधेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांच्याबरोबर द्विपक्षीय करार केले जातील. या सुविधेसाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा मदत...