September 18, 2024 7:12 PM

पुणे शहरात एकंदर तीन लाख ७४ हजार १४८ गणेश मूर्ती विसर्जित

पुणे शहरात एकंदर तीन लाख ७४ हजार १४८ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पुणे महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आलेल्या ४५  हौदांमध्ये एक लाख १ हजार २८१ मूर्तींचं तर ५१६ लोखंडी टाक्यात एकंदर दोन लाख ८२ हजार ६०४ मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेनं मूर्ती दान करण्यासाठी केलेल्या आवाहना...

September 18, 2024 7:10 PM

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेद्वारे दोन दिवसांत ३६३ मेट्रिक टन घन कचरा संकलित करण्यात आला. तसंच, सार्वजनिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांवरचं निर्माल्य गोळा करण्यासाठी यंदा महानगरपालिकेनं ५०० निर्माल...

September 18, 2024 6:59 PM

राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन

उद्योजकांना सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हे राज्य आता उद्योगस्नेही झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या...

September 18, 2024 7:28 PM

पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

पीएम आशा अर्थात पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली. दाळी, तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह यात किमान आधारमूल्य आणि बाजार भाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवणं, ग्राहकांसाठी बाजारभाव स्...

September 18, 2024 6:53 PM

यंदाच्या खरीप हंगामात राज्यात कृषी उत्पन्न ३१ लाख मेट्रीक टनांनी वाढण्याची आशा

राज्यात यंदाच्या खरीप हंगामातलं धान्य उत्पादन सरासरीच्या तुलनेत सुमारे ३१ लाख मेट्रीक टनानं वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी व्यक्त केली. राज्यातल्या खरीप हंगामातल्या पिकांना पावसानं दिलेली योग्य साथ आणि अनुकूल हवामानामुळं यंदाचं खरिपातील धान्योत्पादन चांगलं येण्याची आ...

September 18, 2024 7:46 PM

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडची पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या चीनी खेळाडूवर मात

चीन खुली बॅडमिंटन BWF Super 1000 स्पर्धेत आज महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ गेममधे ग्रेगोरियाला पराभूत केलं. आजच्या इतर सामन्यांमधे मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आ...

September 18, 2024 7:14 PM

राहुल गांधींची हत्या करण्याच्या, त्यांना इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – नाना पटोले

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना इजा पोहचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत दिली.  गेल्या काही दिवसांपासून भाजपा...

September 18, 2024 8:05 PM

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८ पूर्णांक १९ शतांश टक्के मतदान झालं आहे. पहिल्या टप्प्यातल्या २४ विधानसभा मतदारसंघांत सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काश्मीरमधल्या १६ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ६७ पूर्णांक ८६ शतांश ...

September 18, 2024 5:54 PM

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आज नवी दिल्लीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात दिलेल्या ७ आश्वासनांची पूर्तता हरयाणामधे काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर केली जाईल, असं खर्गे यांनी सांगितलं. अंमली पदार्थमुक्त हरयाणा, २५ लाख रुपयां...

September 18, 2024 5:52 PM

डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं आहे. मिशीगनमधे फ्लींट इथं प्रचार मोहिमेतल्या कार्यक्रमात भारत-अमेरिका व्यापाराविषयी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान...